Join us

Video: न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत पुन्हा बिबट्याची दहशत; नागरिकांमध्ये पसरली घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 10:17 PM

या सोसायटीच्या मागील बाजूस सुमारे 150 ते 200 फूट अंतरावर बिबटया चक्क कुत्र्याच्या शिकारी साठी दीड तास इकडे होता

मनोहर कुंभेजकरमुंबई-संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत चक्क आज परत येथील इमारत क्रमांक 19 च्या मागील असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सायंकाळी 6 ते 7.30 दरम्यान बिबट्याचा मुक्त संचार होता. येथील मनसेचे प्रभाग क्रमांक 40 चे शाखाध्यक्ष विजय बोरा व इमारत क्रमांक 19 बी/501 मध्ये राहणारे अजय लाड यांनी लोकमतला ही माहिती दिली.

या सोसायटीच्या मागील बाजूस सुमारे 150 ते 200 फूट अंतरावर बिबटया चक्क कुत्र्याच्या शिकारी साठी दीड तास इकडे होता .येथील 20 ते 25 नागरिकांनी बिबट्याचा मुक्त संचार मोबाईल मध्ये टिपून लाड यांनी लोकमतला सदर व्हिडिओ दिले.येथील इन्फिनिटी आयटी पार्कच्या लगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीतील गिरीराज सोसायटी इमारत क्रमांक 5 मध्ये दि,15 जून रोजी चक्क दुपारी दीडच्या सुमारास येथील सोसायटीच्या मागील बाजूस बिबट्या कुत्र्याची शिकार घेऊन संरक्षक भिंतीवरून चालत होता.तर त्याआधी  तीन दिवस भटकी कुत्री पकडण्यासाठी मध्यरात्री बिबट्या येत होता.आता परत आज पुन्हा बिबटया येथील मानवी वस्तीच्या जवळ आल्याने नागरिकांमध्ये घाबराट पसरली आहे.लोकमत ऑन लाईन आणि लोकमत मध्ये सलग 3-4 दिवस या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते.

या भागात आज पुन्हा बिबटयाचा असलेल्या वावराची शिवसेना स्थानिक आमदार  सुनील प्रभू यांनी  तातडीने दखल घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच  वन संरक्षक अधिकारी रामाराव वनसंरक्षक ठाणे विभाग यांच्याशी संपर्क साधला. या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाचे पथक पाठवून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी त्यांनी केली.उद्या दि,21 रोजी सकाळी 10 वाजता रामराव आणि त्यांचे पथक आणि आपण स्वतः येत असल्याची माहिती आमदार प्रभू यांनी लोकमतला दिली.

लोकमतने  रामाराव यांच्याशी संपर्क साधला असता मी व आमची टीम येथे पाहणी करण्यासाठी येत असून जर बिबटया नागरी वस्तीत वारंवार येत असेल आणि नागरिकांना बिबट्याचा त्रास होत असेल तर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव,नागपूर यांच्या परवानगीने येथे पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :बिबट्या