VIDEO: मराठा आंदोलकांनी रुग्णवाहिकेसाठी करुन दिला रस्ता

By शिवराज यादव | Published: August 9, 2017 01:07 PM2017-08-09T13:07:23+5:302017-08-09T13:16:40+5:30

मुंबई, दि. 9 - महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चाची ज्योत पेटवल्यानंतर मोर्चा राजधानी मुंबईत येऊन धडकला आहे. आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी ...

VIDEO: Maratha protesters made the road for ambulance | VIDEO: मराठा आंदोलकांनी रुग्णवाहिकेसाठी करुन दिला रस्ता

VIDEO: मराठा आंदोलकांनी रुग्णवाहिकेसाठी करुन दिला रस्ता

Next
ठळक मुद्दे ऐतिहासिक मोर्चा शिस्तबद्द पद्धतीने वाटचाल करत असून आझाद मैदानात पोहोचला आहेभायखळा येथे मराठा आंदोलकांनी शिस्तीचं दर्शन घडवत रुग्णवाहिकेला वाट करुन दिलीएकूण सहा हजार स्वयंसेवक रस्त्यावर उभं राहून आंदोलनकर्त्यांना मदत आणि मार्गदर्शन करत आहेत

मुंबई, दि. 9 - महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चाची ज्योत पेटवल्यानंतर मोर्चा राजधानी मुंबईत येऊन धडकला आहे. आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाने काढलेला ऐतिहासिक मोर्चा शिस्तबद्द पद्धतीने वाटचाल करत असून आझाद मैदानात पोहोचला आहे. भायखळामधील जिजामाता उद्यानापासून सुरु झालेला मूक मोर्चा शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आझाद मैदानात येऊन पोहोचला आहे. दरम्यान भायखळा येथे मराठा आंदोलकांनी शिस्तीचं दर्शन घडवत रुग्णवाहिकेला वाट करुन दिली असल्याचं पहायला मिळालं. 

मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी स्वयंसेवकही वारंवार घोषणा करत सहकार्य करण्याचं आवाहन करताना दिसत होते.  एकूण सहा हजार स्वयंसेवक रस्त्यावर उभं राहून आंदोलनकर्त्यांना मदत आणि मार्गदर्शन करत आहेत. सोबतच आंदोलनकर्त्यांसाठी पाणी आणि खाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. रस्त्यांवर जमा होणारा कचरा गोळा करण्यासाठीही स्वयंसेवक पुढाकार घेताना दिसत आहेत. 

{{{{dailymotion_video_id####x8459sv}}}}

अल्पोहार वाटप करणा-या मुस्लिमांचे टाळयांच्या कडकडाटात मानले आभार
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देणा-या मुस्लिम समाजाने आज मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांना अल्पोहार आणि पाणी वाटप केले. यावेळी मराठा आंदोलकांनीही टाळयांच्या कडकडाटात त्यांचे आभार मानले. जेजे उड्डाणपूल सुरु होण्याआधी नागपाडा येथे सिग्नलजवळ खास स्टॉल उभारण्यात आला होता. आंदोलक तिथे दाखल होताच मुस्लिम नागरीकांनी अल्पोहाराचे वाटप सुरु केले. यावेळी दोन्ही समाजातील एकोपा दिसून आला.

आशिष शेलार यांना धक्काबुक्की 
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आझाद मैदानावर धक्काबुक्की करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. आशिष शेलार यांना मराठा कार्यकर्त्यांकडून आझाद मैदानात येण्यास मज्जाव करण्यात आला. 'आधी आरक्षण द्या, त्यानंतर मोर्चामध्ये सहभागी व्हा', अशी मागणी करत आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी आशिष शेलार यांना मैदानात येण्यास मज्जाव केला. आशिष शेलार यांनी मात्रे ही बाब फेटाळून लावली आहे.  

दिरंगाई न करता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या- अजित पवार
राठा समाजाची आरक्षणाची मागणी चुकीची नाही. आत्तापर्यंत शिस्तबद्ध मोर्चे निघाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुणीही राजकारण करू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बोलले आहेत. 

फेटे बांधून विरोधी पक्षाचे आमदार मोर्चात सहभागी
विधानभवनात मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचे तीव्र पडसाद उमटले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून विधानभवनात जोरदार गदारोळ झाला. या गदारोळानंतर फेटे बांधून विरोधी पक्षाचे आमदार मोर्चात सहभागी झाले आहेत. विधानभवनातून विरोधक आझाद मैदानाकडे रवाना होत त्यांनी मोर्चात सहभाग घेतला. विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजीही केली. यावेळी सतेज पाटलांनी अजित पवारांना फेटा बांधला.
 

Web Title: VIDEO: Maratha protesters made the road for ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.