VIDEO : दक्षिण मुंबईत पोलिसांच्या कारवाईत सापडली आधुनिक 'गुहा'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 10:34 AM2018-06-11T10:34:28+5:302018-06-11T10:34:28+5:30
सिंघम म्हणून ओळख असलेल्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदिप लांडे यांनी कारवाई केली आहे.
मुंबई : ग्रॅण्ट रोड येथील बारवर शनिवारी रात्री १२.१५च्या सुमारास अमली पदार्थ विरोधी पथकने छापा टाकला. ग्रॅण्ट रोड येथील कल्पना बारमध्ये ही कारवाई करण्यात आली. या बारमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती एएनसीला मिळाली. त्यानुसार, त्यांनी या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत त्यांनी १२ मुलींची सुटका केली. शौचालयात तयार केलेल्या गुहेतून या मुलींची सुटका करण्यात आली. तर १८ ग्राहकांसह ९ कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. या प्रकरणी आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायमंड चित्रपटगृहाजवळील कल्पना बारच्या मालकाने हा प्रताप केला होता. शौचालयातच बार बालांना लपवण्यासाठी गुहा तयार करण्यात आली होती. मात्र सिंघम म्हणून ओळख असलेल्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदिप लांडे यांनी या गुहेतून १२ बार बालांची सुटका केली. कारवाईत 12 बारबाला, बारमधील 9 जणांसह 18 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे.