Mumbai Local Train Stunt । मुंबई: सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी तरूणाई कोणत्या थराला जाईल याची कल्पना केली जाऊ शकत नाही. इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर त्यांच्या फोटोंना जास्तीत जास्त लाईक्स मिळवण्यासाठी लोक अनोखे स्टंट करत असतात. पण अनेक वेळा लाईक्सच्या शर्यतीत लोक आपला जीव धोक्यात घालतात. असाच एक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. इथे एक तरूण धावत्या लोकलमध्ये सेल्फी घेण्यासाठी ट्रेनच्या दरवाज्यातून बाहेर डोकावून पोझ देत आहे.
सेल्फीसाठी जीवाशी खेळव्हिडीओमध्ये एक तरूण धावत्या ट्रेनमधून बाहेर डोकावताना दिसत आहे. 15 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये तो तरूण फोन हातात धरून सेल्फी काढत आहे. मुंबई मॅटर्स नावाच्या ट्विटर हँडलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओसोबत लिहिले आहे की, "डेथ डिफायिंग सेल्फी. खरंच वेडेपणा, जीवाला धोका. वेगवान #MumbaiLocal ट्रेनमधून लटकणारा सेल्फी. मुंबईत एसी लोकल आवश्यक असण्याचे आणखी एक कारण." व्हिडीओवर लोक त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत. या तरूणावर कारवाई करण्याची मागणी नेटकरी करत आहेत. आता तरूणांमध्ये सेल्फी घेण्याचा हा नवा ट्रेंड सुरू झाल्याची चिंता एकाने व्यक्त केली.
याआधीही समोर आला होता व्हिडीओयाआधीही मुंबई लोकल ट्रेनमधील काही प्रवाशांच्या स्टंटचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये एक तरुण मुंबईच्या लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभा राहून स्टंटबाजी करताना दिसला होता. मात्र, तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"