Join us

Video: मदतीची रक्कम पाहून भोवळ आली, पंकजा मुंडे भावनिक; कार्यकर्त्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 10:01 AM

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची थकीत जीएसटी रक्कम भरण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून जिल्हाभरातून एकाच दिवसात जवळपास दीड कोटी रूपये निधी जमा करण्यात आला आहे.

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ह्या राज्यातील भाजपात अडगळीत पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने होते. त्यातच, त्यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला मिळालेल्या प्रतिसादानंतर काही दिवसांताच त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जी एसटी विभागाकडून काही दिवसापुर्वी  १९ कोटी थकित रकमेसाठी नोटीस बजावण्यात आली. मात्र, सध्या पंकजा मुंडे अडचणीत आहेत, राजकीयदृष्ट्याही अधिक सक्रीय नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडेंसह कार्यकर्त्यांची व समर्थकांचीही घालमेल होत आहे. मात्र, आपल्या नेत्यावरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून पंकजा मुंडेंना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यावर, पंकजा यांनी पहिल्यांदाच व्हिडिओतून भूमिका मांडली आहे. 

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची थकीत जीएसटी रक्कम भरण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून जिल्हाभरातून एकाच दिवसात जवळपास दीड कोटी रूपये निधी जमा करण्यात आला आहे. आत्तापर्यत ५ ते ७ कोटी रुपये जमा झाले असून अनेकजण मदतीचे चेक पंकजा मुडेंकडे पाठवत आहे. आपल्या कार्यकर्त्यांचं हे प्रेम पाहून पंकजा मुंडेंना गहिवरुन आलं आहे. तुमचं हे प्रेम माझ्यासाठी आशीर्वाद आहेत, हेच आशीर्वाद मला हवेत आहेत. माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील बँकेसाठी तुमची प्रेमरुपी ठेव मला मिळावी. मात्र, आपण जी रक्कम मदत निधी म्हणून पाठवत आहात, कृपया ती पाठवू नये, अशी विनंतीच पंकजा यांनी कार्यकर्त्यांना व समर्थकांना केली आहे. 

नोटीससंदर्भात मी कायदेशीर व योग्य ती कार्यवाही करत आहे. त्यासाठी, मी ज्येष्ठ वकील, सीए आणि संबंधित क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा करुन यावर मार्ग काढत आहे. त्यामुळे, आपण आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणासाठी, भविष्यासाठी जमा केलेला पैसा मला देऊ नये, अशी विनंतीच पंकजा यांनी केली आहे. तसेच, मी आज तुमच्यासाठी आईच्या भूमिकेत आहे. आई कधीही लेकराच्या ताटातील ओढून घेत नाही. त्यामुळे, कृपया मला पैसे किंवा चेक पाठवू नयेत, अशी आर्जव पंकजा यांनी समर्थकांना केली आहे. तर, तुमचं हे प्रेम हेच माझ्यासाठी अनमोल आहे, आपणास मुंडेंसाहेबांनी दिलेला स्वाभीमानी बाणा आपण जपुयात, असे म्हणत पंकजा यांनी समर्थकांकडून जमा होणारी रक्कम घेण्यास विनंतीपूर्वक नकार दिला आहे.  माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी  साखर कारखान्याची १९ कोटी थकित जीएसटी पोटी संबंधित विभागाकडून काही दिवसापुर्वी नोटीस बजावण्यात आली होती. त्या अनुषंगाने त्यांना हातभार लावण्यासाठी बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातून समर्थक लोकसहभागातून पैसा जमा करत आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या पंकजा मुंडेंच्या मदतीसाठी त्यांचे चाहते पैसा उभा करत आहेत. एका दिवसात जवळपास दीड कोटीच्या पुढे रक्कम जमा झाली. दसरा मेळाव्यात ही रक्कम पंकजा मुंडे, व खा.प्रितम मुंडे याच्या कडे सुपूर्द करण्यात येणार होती. 

लोकसहभागातून यांनी केला निधी उभा 

डॉ. शालिनीताई कराड ५० लाख, राजाभाऊ दगडखैर ११ लाख ११ हजार १११, दत्ता बडे १ लाख ११ हजार, विजय गोल्हार ११ लाख, युनुसभाई शेख ११ लाख, कासेवाडी ग्रामस्थ ७ लाख २० हजार, रामदास बडे ५ लाख, संदिपान ठोंबरे ५ लाख, प्रकाश खेडकर १ लाख ५० हजार ,आण्णासाहेब भोसले १ लाख,भारत तोंडे १ लाख,विष्णू मुंडे १ लाख, व्यंकटी मुंडे १ लाख, विवेक १ लाख, डाॅ.लक्ष्मण जाधव ५१ हजार, धनराज मुंडे ५१ हजार, विनोद बागर ५१ हजार,  आजिनाथ सानप ५१ हजार, रामराव खेडकर ५० हजार, यादव महात्मे ५१ हजार, तेजस तिडके २१ हजार, यांनी रक्कम जमा केली आहे. 

टॅग्स :पंकजा मुंडेभाजपासाखर कारखाने