मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दोन प्रवाशांमध्ये अंतर राहण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने स्थानकात वर्तुळे तयार केली आहेत. प्रवासी या वर्तुळात रांगेत उभे राहून लोकलची वाट बघत असतात. यासंदर्भातील सीएसएमटीवरील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याचे जगभरातून कौतुक होत आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हा व्हिडीओ ट्विट केला होता. या व्हिडीओला आइसलँडचे माजी अध्यक्ष औलावुर राग्नार ग्रिमसन यांनी कौतुक केले. त्यांनी व्हिडिओला रिट्विट करून म्हटले की, भारतात हे शक्य आहे. तर इतर देशांनी कोणतेही कारण देता कामा नये.
कोरोनाच्या काळात फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेने शक्कल लढविली. मध्य रेल्वे प्रशासनाने स्थानकावर वर्तुळे, लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी दिशादर्शके स्थानकावर तयार केली आहेत. यातून स्थानकांवर चिन्हांकीत करण्यात आलेल्या जागेवरच प्रवासी उभे असल्याचे दिसून आले.
या व्हिडिओला पाहून अनेक जण आश्चर्यचकित झालेत. तर, विदेशातील राजकीय नेते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील रेल्वे स्थानकात नेत्रदीपक दर्शन. शिस्त, सहकार्य आणि सामाजिक अंतर ठेवून लोकल प्रवास, अशा आशयाचा मेसेज ट्विट करून सीएसएमटीवरील व्हिडीओ अपलोड केला. त्यानंतर आइसलँडचे माजी अध्यक्ष औलावुर राग्नार ग्रिमसन यांनी व्हिडिओला रिट्विट करून म्हटले की, भारतात हे शक्य आहे. तर इतर देशांनी कोणतेही कारण देता कामा नये.
गोयल यांनी या ट्विटला रिट्विट करत म्हणाले की, कोरोनाच्या काळात भारतात वाहतूक सुरु ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोना काळात रेल्वे वाहतूक कायम ठेवण्याच्या भारताच्या प्रयत्नांविषयी आपल्या उबदार शब्दांचे कौतुक आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी एक उदाहरण ठेवण्यात भारतीय रेल्वेला अभिमान आहे.
आणखी बातम्या...
ऑनलाईन द्वेष, गुंडगिरी यावर आळा घाला - रतन टाटा
"आम्ही चीनला धडा शिकवण्यासाठी अन् शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जातोय"
धक्कादायक! पतीकडून पत्नीची डोक्यात कुकर घालून हत्या, परिसरात खळबळ
Google मुळे 40 वर्षांनंतर 93 वर्षीय आजी आपल्या कुटुंबीयांना भेटली!
राखी सावंतचा दावा; स्वप्नात आला सुशांत सिंग राजपूत अन् म्हणाला, 'तुझ्या पोटी घेईन पुनर्जन्म!'
नवी मुंबईत 12 इंच व्यासाच्या खगोलशास्त्रीय दुर्बिणीमधून पाहिले सूर्यग्रहण