३ मे रोजी दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर दानापूर ट्रेनमध्ये एका लहान मुलासह चढण्याचा प्रयत्न करीत असलेली गरोदर महिला तोल जाऊन खाली पडली झाली. ड्युटीवरील तैनात असलेल्या आरपीएफ कर्मचारी अशोक यादव यांनी प्रसंगावधान दाखवत पळत जाऊन गरोदर महिलेसह लहान मुलाचा जीव वाचविला. याबाबत मध्य रेल्वेने ट्विटर हॅण्डलवर ट्वीट केले असून या घटनेचे सीसीटीव्ही देखील ट्वीट केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वांगणी येथे रेल्वे स्टेशनवर अंध महिलेच्या मुलाचा स्वतःचा जीव धोक्यात घालून जीव वाचवणारा बहाद्दूर मयूर शेळकेप्रमाणे यादव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तसेच या थरारक घटनेचे ट्वीट करून मध्य रेल्वेने प्रवाशांना धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करु नका, असा मोलाचा सल्ला दिला आहे. दादर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म ५ वर रविवारी सीएसएमटी- दानापुर स्पेशल गाडीत चढत असताना एक गर्भवती महिला आपल्या मुलासह पडली. त्याचवेळी उपस्थित असलेले आरपीएफ जवान अशोक यादव धावत जाऊन महिला आणि तिच्या मुलाचे प्राण वाचवले.
या महिलेचे नाव शोभा कुमारी आहे, ती दादर वरून दानापूरला जात होती. मात्र तिला उशीर झाला. गाडी सुरू झाल्याने धावत जाऊन तिने गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा तोल गेला त्यामुळे आणि मुलगा खाली पडला मात्र अशोक यादव यांनी प्रसंगावधान दाखवत दोघांनाही रेल्वे खाली जाण्यापासून वाचवले. याबाबत जवान यादव यांचे कौतुक करण्यात असून त्यांना लवकरच सन्मानित केले जाणार आहे. दरम्यान प्रवाशांनी चालू गाडीत चढू अथवा उतरू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.