VIDEO - विदर्भ आणि अंबानगरी एक्स्प्रेस ठाण्यात थांबवण्यासाठी निदर्शने

By Admin | Published: January 21, 2017 02:09 PM2017-01-21T14:09:04+5:302017-01-21T14:15:26+5:30

ऑनलाइन लोकमत ठाणे, दि. २१ -  विदर्भात जाणा-या सर्व लांबपल्याच्या गाड्या मुंबईतून जाताना तसेच येताना ठाणे स्थानकात थांबाव्यात या ...

VIDEO - Protests to stop Vidarbha and Ambanagari Express Thane | VIDEO - विदर्भ आणि अंबानगरी एक्स्प्रेस ठाण्यात थांबवण्यासाठी निदर्शने

VIDEO - विदर्भ आणि अंबानगरी एक्स्प्रेस ठाण्यात थांबवण्यासाठी निदर्शने

Next

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. २१ -  विदर्भात जाणा-या सर्व लांबपल्याच्या गाड्या मुंबईतून जाताना तसेच येताना ठाणे स्थानकात थांबाव्यात या मागणीसाठी ठाणे रेल्वे स्थानकात शनिवारी विदर्भ समाज संघटनेच्या पदाधिका-यांनी धरणे आंदोलन केले.
सॅटीस ब्रीजखाली, फलाट क्रमांक १च्या बाहेर हे आंदोलन सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाले. कोण म्हणत देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही असे नारे देत त्यांनी विदर्भ आणि महाराष्ट्र एक्स्प्रेसला अप-डाऊन दोन्ही दिशांवर ठाणे स्थानकात थांबा द्यावा या मागणीचा पुर्नउच्चार करत रेल्वे प्रशासनाने जागे व्हावे अशी मागणी केली. संघटनेची ही मागणी रास्त असल्याने ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेसह नवी मुंबईतील काही कार्यकर्त्यांनी त्यात सहभाग घेत पाठींबा दिला. ठाण्यासह नवी मुंबई, मुलुंड, नाहुर भांडुप आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विदर्भवासीय वास्तव्याला आहेत. त्यांना सुट्यांच्या कालावधीसह अन्य मोसमात गावी जातांना ठाण्यात गाड्या थांबत नसल्याने सीएसटीला जावे लागते. कुटुंबासह सामान घेउन जातांना अबालवृद्धांची आबाळ होते, त्यासाठी हे आंदोलन करावे लागत असल्याचे संघटनेचे पुरुषोत्तम भुयार यांनी स्पष्ट केले. त्यासंदर्भात संघटनेने ठाणे लोहमार्ग पोलीसांना निवदेन देत एक दिवसीय नीदर्शने, धरणे आंदोलन असे म्हंटले आहे. संध्याकाळी ५ पर्यंत हा उपक्रम सुरु राहणार असल्याचे संघटनेने सांगितले. विशेषत: विदर्भ एक्स्प्रेस आणि अमरावतील जाणारी अंबानगरी एक्सप्रेस ठाणे स्थानकात थांबावी ही त्यांची मुख्य मागणी होती. या निमित्ताने प्रवाशांसह नागरिकांनी नीवदेनावर सह्या कराव्यात असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले. सह्यांसह मागणीपत्र रेल्वेच्या वरिष्ठांना देणत येणार असल्याचे सांगण्यात आले.
 

https://www.dailymotion.com/video/x844osn

Web Title: VIDEO - Protests to stop Vidarbha and Ambanagari Express Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.