Join us

Video: राज ठाकरेंच्या ईडी चौकशीमागे भाजपाची वेगळीच 'राजनीती'?; काँग्रेस-राष्ट्रवादीनेही केली होती अशीच खेळी

By अतुल कुलकर्णी | Published: August 19, 2019 11:40 PM

असाच प्रकार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी राज यांच्या मनसे पक्षाला हवा मिळावी म्हणून राज यांना अटक केली, रात्रभर पोलिस ठाण्यात ठेवले.

- अतुल कुलकर्णी

मुंबई : भाजप शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर राजकीय मेगा भरती सुरु आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातले मूळ कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे सरकारच्या विरोधात असणारी नाराजी मतांमध्ये परावर्तीत होऊन ती काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बाजूने गेली तर आपल्या उमेदवारांचे नुकसान होऊ शकते.  त्यासाठी राज ठाकरे यांना हवा द्या, जेणे करुन राज यांना सहानुभूती मिळेल आणि ही नाराजी राजच्या बाजूने जाईल अशी व्यूव्हरचना या सगळ्या खेळी मागे असल्याची माहिती समोर येत आहे.

असाच प्रकार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी राज यांच्या मनसे पक्षाला हवा मिळावी म्हणून राज यांना अटक केली, रात्रभर पोलिस ठाण्यात ठेवले. त्यातून राज यांच्या बाजूने मोठे वातावरण तयार झाले, परिणामी राज यांचे १३ उमेदवार निवडून आले होते. आता देखील असेच काही घडवले जात आहे. राज यांचे किती उमेदवार निवडून येतील यापेक्षा ते भाजप सेनेला किती डॅमेज करतील याचा अभ्यास दोन्ही पक्षातील धूरीण करत आहेत. राज यांनी जाणीवपूर्वक भाजप सेनेच्या विरोधात उमेदवार उभे करण्यासाठीचे नियोजन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार करत आहेत. वंचित आघाडीचा फटका जसा काँग्रेस, राष्ट्रवादीला बसला तसाच फटका आता राज यांच्या रुपाने भाजप सेनेला द्यायचा असा त्यामागे हेतू आहे. मात्र पवार ही खेळी खेळणार हे लक्षात आल्यामुळे त्यांचेच शस्त्र त्यांच्यावर उलटवण्याची खेळी चाणाक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

आमच्या सरकारच्या विरोधात ‘अ‍ॅन्टीइन्कंबन्सी’ असेल तर ती काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जाऊ नये, यासाठी आम्हाला दोघांमध्ये काही तरी ‘व्यवस्था’ करणे भाग होते. याबाबतचं सविस्तर वृत्त ऐकण्यासाठी पाहा हा व्हिडीओ...

टॅग्स :राज ठाकरेअंमलबजावणी संचालनालय