Join us

VIDEO : त्या वक्तव्यासाठी राम कदम यांनी मागितली 'क्षमा'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 9:31 PM

मुलीने नकार दिला तरी तिला पळवून आणण्यास आपण मदत करू, असे बेताल वक्तव्य करणारे भाजपा आमदार राम कदम यांनी अखेर त्या वक्तव्यासाठी क्षमा मागितली आहे.

मुंबई - मुलीने नकार दिला तरी तिला पळवून आणण्यास आपण मदत करू, असे बेताल वक्तव्य करणारे भाजपा आमदार राम कदम यांनी अखेर त्या वक्तव्यासाठी क्षमा मागितली आहे. सर्व माता, भगिनींचा सन्मान माझ्यासाठी सर्वोच्च आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत कोणतीही सबब न देता मी क्षमा मागत आहे, असे राम कदम यांनी म्हटले आहे.

 सोमवारी दहिहंडी उत्सवावेळी उपस्थित तरुणांशी संवाद साधताना भाजपाचे आमदार राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. विरोधकांसह सर्वसामान्यांनीदेखील राम कदम यांच्यावर तोंडसुख घेतले होते. त्यानंतर राम कदम यांनी त्यांच्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला होता. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. दुखावल्या असतील तर मी खेद करतो, असे राम कदम यांनी म्हटले होते. काय म्हणाले होते राम कदम?भाजपा आमदार राम कदम यांनी काल घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असं राम कदम दहिहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.

टॅग्स :राम कदमदही हंडीराजकारण