Join us

Video: RPF महिला पोलिसाने वाचवला महिला प्रवाशाचा जीव, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 2:25 PM

मुंबईच्या बांद्रा टर्मिनस स्टेशनवर नातेवाईकासमवेत एक महिला प्रवासी गाडी पकडण्यासाठी पोहोचली होती.

मुंबई - ओडिशाच्या बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेनं देश हादरला. या दुर्घटनेत शेकडो जणांनी आपला जीव गमावला. तर, हजारो नागरिकांनी आपला जवळचा व्यक्ती गमावला आहे. या घटनेनं संपूर्ण देशवासीयांना दु:ख झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अनेकांचा जीव वाचवण्यात यंत्रणेला यश आले, तर काहीजण दैव बलवत्तर म्हणून बचावले. मुंबईतील रेल्वे स्टेशनवरही अनेकदा प्रवासी किंवा रेल्वे कर्मचारी देवदूत बनून प्रवाशांचे जीव वाचवताना यापूर्वी आपण पाहिलं आहे. आताही, मुंबईतील बांद्रा स्टेशनवर, रेल्वेत चढणाऱ्या एका महिलेचा जीव वाचवण्यात RPF महिला पोलीस कर्मचाऱ्याला यश आले. 

मुंबईच्या बांद्रा टर्मिनस स्टेशनवर नातेवाईकासमवेत एक महिला प्रवासी गाडी पकडण्यासाठी पोहोचली होती. त्यावेळी, समोरुन आलेल्या गाडीत बसण्यासाठी त्या महिला प्रवाशाने धावाधाव केली. मात्र, गाडी प्लॅटफॉर्मवर थांबवण्यापूर्वीच महिला प्रवासी ट्रेनमध्ये चढू लागली. यावेळी, पाय घसरुन ती महिला खाली कोसळली. त्यावेळी, तिथं कार्यरत असलेल्या महिला RPF पोलीस कर्मचाऱ्याने वेगाने महिलेकडे धाव घेत तिला प्लटॅफॉर्मवर खेचलं. त्यामुळे, या महिला प्रवाशाचा जीव वाचवा. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून वेस्टर्न रेल्वेने ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. तसेच, प्रवास करताना काळजी घेण्याचंही सूचवलं आहे. 

धावत्या ट्रेनमध्ये चढू किंवा उतरू नका, धावत्या ट्रेनमधून चढणे किंवा उतरणे धोकादायक आहे, असेही  रेल्वेने आपल्या ट्विटवरुन सांगितलंय. तसेच, या घटनेचा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करुन महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या धाडसाचे आणि प्रसंगावधानतेचं कौतुक केलंय. 

टॅग्स :रेल्वेसोशल व्हायरलपश्चिम रेल्वे