Video : संजय राऊत खातो सेनेचं जागतो पवारांना, पडळकरांची खरमरीत शब्दात टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 02:02 PM2021-06-28T14:02:28+5:302021-06-28T14:04:04+5:30
संजय राऊत खातो सेनेचं अन् जागतो पवारांना, राऊतांसारख्या भाटाची धनगर समाजाला आवश्यकता नाही. धनगर समाजाला जे एक हजार कोटींचं बजेट मंजूर केलं होतं
मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत भाजपाच्या ओबीसी आरक्षणा आंदोलनावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. फडणवीसांनी आरक्षणाचा राजकारण करु नये, असे राऊत यांनी म्हटले होते. राऊत यांच्या टीकेला आता धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोचऱ्या शब्दात पडळकरस्टाईल प्रत्युत्तर दिलंय.
संजय राऊत खातो सेनेचं अन् जागतो पवारांना, राऊतांसारख्या भाटाची धनगर समाजाला आवश्यकता नाही. धनगर समाजाला जे एक हजार कोटींचं बजेट मंजूर केलं होतं. ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं, संजय राऊताच्या मालकानं त्यातला एकही रुपया अद्याप दिला नाही. ओबीसी समाजाकरता फडणवीसांनी 23 जीआर काढले, हे संजय राऊतांना माहिती नाही, त्या 23 जीआर पैकी एकाही जीआरची अंमलबजावणी या सरकारने केली नाही, त्याबद्दल मी सरकारचा जाहीर निषेध करतो, असे संजय राऊत यांनी म्हटलंय.
भावा भावामध्ये भांडण लावून दस्तलेखक म्हणून भावाचा राजीनामा घेतला. आता, काकाच्या सांगण्यावरुन अविनाश भोसले अजित पवारांच्या किती जवळचे आहेत, असं सांगून अजित पवारांच्या बुडाखाली फटाके वाजवाजयं काम हा हुजऱ्या करतोय, असा हुजऱ्या ना कधी जन्माला आला ना कधी येईल, अशा बोचऱ्या शब्दात पडळकर स्टाईलने राऊतांवर टीका केली आहे.
संजय राऊत खातो सेनेची व जागतो पवारांना..अशा भाटाची #Dhangar समाजाला आवश्यकता नाही.
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) June 27, 2021
काकांच्या सांगण्यावरून अग्रलेखात अविनाश भोसले हे किती #Ajit_Pawar च्या जवळचे आहेत हे सांगतोय आणि पुतण्याच्या मागे फटाके लावतोय. @BJP4Maharashtrapic.twitter.com/ErzYb5fXfp
ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय.
महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेते पवार काका-पुतण्याच्या ताटाखालील मांजर झालेले आहेत. तर, ओबीसी मंत्र्यांचं माकड झालेलं आहे. ओबीसी मंत्र्यांच्या शब्दाला कवडीचीही किंमत राहिली नाही. निवडणूक होऊ देणार नाहीत, अशी घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे, ओबीसी नेते मलिदा खाण्यासाठीच सत्तेत आहेत का, असा प्रश्न पडळकर यांनी विचारला आहे. ओबीसी समाज आता गप्प बसणार नाही. 26 जून ओबीसी समाज आपली ताकद दाखवेल, असा इशाराही पडळकर यांनी दिला.