Video: एकनाथ खडसेंची विचारपूस करण्यासाठी शरद पवार पोहोचले रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 12:51 PM2023-11-06T12:51:21+5:302023-11-06T13:14:22+5:30

मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एकनाथ खडसे यांच्या पुढील तपासण्या होत आहेत.

Video: Sharad Pawar Meet and question Eknath Khadse at Sharad Pawar in bombay Hospital | Video: एकनाथ खडसेंची विचारपूस करण्यासाठी शरद पवार पोहोचले रुग्णालयात

Video: एकनाथ खडसेंची विचारपूस करण्यासाठी शरद पवार पोहोचले रुग्णालयात

मुंबई -  राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना छातीत त्रास होत असल्याने जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्री त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर, आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रसेचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी, खडसे यांच्या पत्नी मंदिकीनी खडसे ह्याही उपस्थित होत्या. 

मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एकनाथ खडसे यांच्या पुढील तपासण्या होत आहेत. तत्पूर्वी, मुक्ताईनगरला खडसेंच्या छातीत दुखायला लागले. त्यांना गजानन हार्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. तिथे, त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांनी आ. एकनाथ खडसे यांची मुंबईतील रुग्णालयात भेट घेवून तब्येतीची चौकशी केली. यावेळी, एकनाथ खडसे यांच्या पत्नी उपस्थित होत्या. शरद पवार यांनी खडसेंसोबत संवाद साधला, त्यावेळी खडसेंनीही त्यांच्याशी बातचीत केली. या भेटीचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. 

 

Web Title: Video: Sharad Pawar Meet and question Eknath Khadse at Sharad Pawar in bombay Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.