Join us

Video: उद्धव ठाकरेंना धक्का; मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 8:23 PM

आज मुंबई महापालिकेत शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये मोठा राडा झाला. शिंदे गटाने महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतले.

मुंबई: आज मुंबई महापालिकेत शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये मोठा राडा झाला. आज (दि.28) शिंदे गटाने महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतले. यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले, यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष झाला. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजा करण्यात आली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत झाले.

आज मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार राडा झाला. महापालिकेतील शिवसेना पक्षाच्या कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवला. यावेळी कार्यालयाचे औपचारिक उद्घाटनही शिंदे गटाकडून करण्यात आले. बऱ्याच काळापासून हे कार्यालय बंद होते. आज अखेर पालिका आयुक्तांची भेट घेऊन शिंदे गटाने या कार्यालयाचा ताबा मिळवला. यावेळी राहुल शेवाळे, शितल म्हात्रे आदि नेत्यांनी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेटही घेतली.

पक्षाच्या कार्यालयावर ताबा मिळवल्यानंतर ठाकरे गट पोहोचला. यावेळी पालिकेत दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महापालिकेमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे, पदाधिकाऱ्यांची संख्याही आमच्याकडे जास्त आहे, त्यामुळे हे कार्यालय आपल्याला मिळावे अशी मागणी शिंदे गटाने आयुक्तांकडे केली. 

कार्यालयबाहेरच्या पाटीवरील यशवंत जाधव यांचे नाव झाकून टाकण्यात आले होते. या नावावर लावलेली पट्टी शिंदे गटाने काढली. यशवंत जाधव यांच्याकडेच हे कार्यालय होते, पण ते त्यांना मिळत नव्हते. अखेर त्यांनी या कार्यालयावर ताबा मिळवला आहे. यावेळी शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. 

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे