मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये, कॅमेऱ्यामागचे जितेंद्र आव्हाड दिसत आहेत. आपल्या मुंब्रा-कळवा मतदारसंघातील विकासकामांची माहिती देतानाचा एक व्हिडीओ त्यांनी बनवला होता. या व्हिडीओमध्ये मुंब्रातील लोडशेडिंगचा मुद्दा ते मांडताना दिसत आहेत. पण, आपलं व्हिडीओ शुटींग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जे बोललं ते आश्चर्य वाटणारं आहे.
भाजपा समर्थक असलेल्या फेसबुक पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात येत आहे. निवडणूककाळात मी किती विकास केला, कधी काळी अंधारात असलेलं मुंब्रा शहर आता लोडशेडिंगमुक्त आहे, असे आव्हाड हिंदीमध्ये सांगत आहेत. मात्र, या व्हिडीओसाठी ठरलेलं स्क्रीप्ट पूर्ण झाल्यानंतरही व्हिडीओचे शुटींग सुरूच राहिले. त्यामुळे, आव्हाडांचं नाटकी संभाषण पुढे आलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुक काळात स्वत:साठी निवडणूक कॅम्पेन राबवलं होतं. त्यासाठी ते व्हिडीओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपावर टीका करत होते, तसेच आपण केलेल्या कामांची माहितीही लोकांपर्यंत पोहोचवत होते. त्यादरम्यान, शुट केलेल्या व्हिडीओचा हा एक भाग आहे. एवढं नाटक दुसरं कोण करू शकेल का? रिटेक न घेता... असं आव्हाड कॅमेऱ्यामागे बोलताना ऐकू येत आहे. तो आवाजही आव्हाडांचाच असल्याचं दिसून येतंय. पाहा व्हिडिओ -