मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात, कधी त्यांच्या गाण्यामुळे, कधी त्यांच्या फॅशनमुळे तर कधी राजकीय टीकाटिप्पणीमुळे..अमृता फडणवीस या नेटिझन्सच्या रडारवर असतात. व्हॅलेंटाईन डे(Valentine’s Day) निमित्त अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीज झालं आहे. ट्विटरवरून अमृता फडणवीसांनी हे गाणं शेअर केले आहे.
‘ये नयन डरे डरे’ असं या नवीन गाण्याचं नाव आहे.(New Song of Amruta Fadnavis) मी माझ्या व्हॅलेंटाईनसोबत आनंदात आहे, हे नवीन गाणं सुंदररित्या दिग्दर्शक आशिष पांडा यांनी बनवलं आहे. गेल्या २४ तासांत हा नवीन व्हिडीओ ४७ हजार ५१३ जणांनी पाहिला आहे. त्यावर नेटिझन्सने कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी या गाण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
मागच्याच महिन्यात अमृता फडणवीस यांनी 'झी म्यूझिक मराठी'च्या आगामी 'अंधार' या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटासाठी अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं होतं. ''डाव मांडते भीती'', असे गाण्याचं शीर्षक असून गाण्याच्या व्हिडिओमध्ये गुन्हेगारी थ्रीलर घटना दाखवल्या होत्या. Jazz पढडीतील या गाण्यात अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजासह मनमोहक अदांनी व्हिडिओला रेट्रो लूक देण्याचा प्रयत्न केला होता.
‘तिला जगू द्या, जन्म घेऊ द्या’ गाण्यावरून झाला होता वाद
अमृता फडणवीस यांनी तिला जगू द्या, जन्म घेऊ द्या या नवीन गाण्याच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येवर भाष्य केले होते, त्यानंतर दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी सोशल मीडियात भलीमोठी पोस्ट लिहून अमृता फडणवीस यांच्या गाण्याची खिल्ली उडवली होती. आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता. यावरून अभिनेता आरोह वेलणकर याने महेश टिळेकरांवर टीकास्त्र सोडलं होतं. महेश टिळेकर तुमची टीका वाचून लाज वाटली, स्त्री शक्ती, सन्मानाच्या गोष्टी करता, ही कसली भाषा तुमची? नसेल आवडत तर नका ऐकू असं बजावलं होतं. आरोहची ही पोस्ट पाहून महेश टिळेकर पुन्हा संतपाले होते. त्यांनीही आरोहला बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय, तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथं, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन मला सांगतोय असं म्हटल्याने यावरून वाद निर्माण झाला होता.