Join us

Video: अहो फडणवीस, काहो फडणवीस, कसं हो फडणवीस; काँग्रेस नेत्याचा टिकटॉक स्टाईल टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 2:02 PM

या टिकटॉकवर सुरु असलेल्या ट्रेंडचा वापर राजकीय पक्षातील नेतेमंडळीही करताना दिसत आहे

मुंबई - सध्या सोशल मीडियावर टिकटॉक या अ‍ॅपने धुमाकूळ घातला आहे. गाण्यावरील व्हिडीओ बनवून अनेक टॅलेंट नावारुपाला येऊ लागले आहेत. टिकटॉक अ‍ॅपने तरुणाईवर भूरळ घातली आहे. या व्हिडीओ अ‍ॅपमधून विविध ट्रेंड व्हायरल होताना पाहायला मिळतात. नुकताच सोशल माध्यमात 'आला वारा गेला वारा' या ओळी प्रचंड प्रमाणात गाजताना दिसत आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन त्यांना व्हिडीओत टॅग केलं जातं. 

या टिकटॉकवर सुरु असलेल्या ट्रेंडचा वापर राजकीय पक्षातील नेतेमंडळीही करताना दिसत आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्हायरल होणाऱ्या या ट्रेंडच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे. ट्विटरवर सचिन सावंत यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर टीका करताना पाहायला मिळतात. 

या व्हिडीओ देवेंद्र फडणवीस म्हणतात की, ठाकरे सरकार म्हणजे तीन चाकांची ऑटो रिक्षा, हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही त्यावर सचिन सावंत यांनी गेली सत्ता, गेलं सरकार, जीव झाला कासावीस, गेली सत्ता, गेलं सरकार जीव झाला कासावीस, अहो फडणवीस, काहो फडणवीस, कसं हो फडणवीस अशा शब्दात टिकटॉक स्टाईलने टोला लगावला आहे. 

सोशल मीडियाच्या युगामध्ये अल्पप्रमाणात टिकटॉक अ‍ॅपने आपलं नावं कमावलं आहे. फेसबुकला टक्कर देणाऱ्या या अ‍ॅपची तरुणाईवर प्रचंड क्रेझ आहे. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत अनेक जण आपल्यातील छुपं टॅलेंट या माध्यमातून समोर आणत आहे. अगदी लहानापासून मोठ्यापर्यत प्रत्येक जण या टिकटॉक अ‍ॅपच्या प्रेमात पडलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसच्या युवक संघटनेने या माध्यमाचा वापर करत तरुणाईला जवळ करण्याचा प्रयत्न केला होता. मी मुख्यमंत्री झालो तर अशी संकल्पना युवक काँग्रेसने समोर आणली होती. त्याचसोबत नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे या नेत्यांची टिकटॉक अ‍ॅपवर बरेच चाहते आहेत. किर्तनकार इंदुलीकर महाराजांच्या किर्तनाचे अनेक व्हिडीओ टिकटॉक अ‍ॅपवर प्रसिद्ध झालेले दिसून येतात. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीससचिन सावंतटिक-टॉकसोशल मीडिया