Vidhan Parishad Election: विधान परिषदेची निवडणूक अटीतटीची, पण...; भाजपा नेते विनोद तावडेंचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 02:34 PM2022-06-18T14:34:58+5:302022-06-18T14:35:29+5:30

राज्यसभेच्या निकालात महाविकास आघाडीला धक्का बसल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी सतर्कता बाळगली आहे.

Vidhan Parishad Election are difficult, but BJP will win 5 candidate Says Vinod Tawde | Vidhan Parishad Election: विधान परिषदेची निवडणूक अटीतटीची, पण...; भाजपा नेते विनोद तावडेंचा विश्वास

Vidhan Parishad Election: विधान परिषदेची निवडणूक अटीतटीची, पण...; भाजपा नेते विनोद तावडेंचा विश्वास

Next

मुंबई - राज्यसभेला ११ मते कमी होती. त्यात दाखवून मतदान झाले तरी मते मिळवली आता तर गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे गुप्त आशीर्वाद कोणाकोणाचे मिळणार आहे. ते २० तारखेला कळणार आहे. भाजपानं जिंकण्याची रणनीती आखली आहे. राज्यातील आमदार घोडेबाजाराने विकला जात नाही. चांगले संबंध, मैत्री असते त्यातून मदत होत असते असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे.

विनोद तावडे(BJP Vinod Tawade) म्हणाले की, विधान परिषदेची निवडणूक अटीतटीची होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतही भाजपाबाबत विविध विधानं केली जात होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यसभेत जसा विजय मिळाला तसाच विधान परिषद निवडणुकीत मिळेल. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही हे वारंवार आघाडीतील घटक पक्ष दाखवून देत आहे. त्यामुळे विधान परिषदेतही पाच उमेदवार भाजपा निवडून आणले असा विश्वास आहे. 

तसेच राज्यसभा लढायची नाही हे मी केंद्रीय नेतृत्वाला आधीच सांगितले होते. भाजपा योग्य व्यक्तीला योग्य वेळी संधी देते. चाहत्यांची इच्छा असते मात्र पक्षात अन्याय कोणावरही होत नाही. मी विधान परिषदेतही आणि राज्यसभेतही इच्छुक नव्हतो. भाजपाचे ५ जण निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही विनोद तावडेंनी सांगितले. 

राज्यसभेच्या निकालात महाविकास आघाडीला धक्का बसल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी सतर्कता बाळगली आहे. या निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपाने ५, महाविकास आघाडीतर्फे ६ उमेदवार आहे. संख्याबळ नसताना काँग्रेसनं या निवडणुकीत अतिरिक्त दुसरा उमेदवार उभा केला आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराला ८ ते १० मतांची गरज आहे. तर भाजपालाही पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

मुक्काम हॉटेलांमध्ये
शिवसेनेचे आमदार शुक्रवारी पवईतील हॉटेलकडे रवाना झाले. भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदारही शनिवारपासून वेगवेगळ्या ठिकाणी असतील. काँग्रेसच्या आमदार शनिवारी विधानभवनात येऊन हॉटेलवर जातील. 

Web Title: Vidhan Parishad Election are difficult, but BJP will win 5 candidate Says Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.