Vidhan sabha 2019 : भाई जगतापांचे दुबईतपण घ,र उत्पन्नासोबत कर्जही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 03:53 AM2019-10-02T03:53:15+5:302019-10-02T03:54:14+5:30

कुलाबा विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार भाई उर्फ अशोक जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

Vidhan sabha 2019: Bhai Jagtap's home in Dubai, loan also increased with income | Vidhan sabha 2019 : भाई जगतापांचे दुबईतपण घ,र उत्पन्नासोबत कर्जही वाढले

Vidhan sabha 2019 : भाई जगतापांचे दुबईतपण घ,र उत्पन्नासोबत कर्जही वाढले

Next

मुंबई : कुलाबा विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार भाई उर्फ अशोक जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. अर्ज सादर करणारे ते मुंबईतील पहिले काँग्रेस उमेदवार ठरले आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रासुसार भाई जगताप यांची दुबईतसुद्धा घरे आहेत. विशेष म्हणजे एकीकडे उत्पन्न वाढत असताना जगतापांच्या डोक्यावरील कर्जही वाढत आहे.

भाई जगताप यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार वांद्रे येथे त्यांचे निवासस्थान आहे. याशिवाय, महालक्ष्मी, मड, मुरूड, लोणावळा, वाशी, मंडणगड आणि चिपळूण येथे जगताप पती-पत्नींच्या नावे घरे आहेत. याशिवाय, दुबईमध्येही दोन रहिवासी फ्लॅट आहेत. तर, एक व्यावसायिक फ्लॅट आहे. एकूण १३ कोटींची स्थावर मालमत्ता आणि १९ कोटींची जंगम मालमत्ता असल्याचे जगताप यांनी नमूद केले आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात भाई जगताप यांचे उत्पन्न वाढल्याची माहिती पुढे आले आहे. एकीकडे उत्पन्न वाढले असले तरी त्यांच्या कर्जांचा डोंगर असल्याचे दिसून आले असून आयोगाकडे दिलेल्या माहितीत त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर सुमारे १९ कोटींचे कर्ज असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मागील चार आर्थिक वर्षांच्या तुलनेत भाई जगताप यांचे उत्पन्न वाढले असले तरी कर्जाचे डोंगरही वाढले आहे. २०१८ -१९ साली त्यांचे उत्पन्न ५१ लाख ९३ हजार २१८ इतके असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार जगताप कुटुंबावर एकूण १९ कोटी ८३ लाख ३६ हजार ७४९ इतके कर्ज असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यात भाई जगताप यांच्यावर सुमारे १६ कोटी तर पत्नी तेजस्विनी यांच्यावर २ कोटींचे कर्ज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबियातील इतर दोघांवर १० लाख ४० हजार आणि १ कोटी १५ लाख ६१ हजार ६५३ इतके कर्ज असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले
आहे.
भाई जगताप यांच्याकडे फोर्ड एन्डेव्हर आणिं इनोव्हा क्रिस्टा या दोन चारचाकी गाड्या आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे दोन मर्सिडीजघ बेन्झ् गाड्या आहेत.

Web Title: Vidhan sabha 2019: Bhai Jagtap's home in Dubai, loan also increased with income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.