Join us

Vidhan sabha 2019 : सोशल मीडियाद्वारे मतदारांशी संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 1:14 AM

अणुशक्तीनगर, मानखुर्द-शिवाजीनगर व घाटकोपर (पू.) मतदारसंघातील प्रमुख पक्षांचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते दिवसभर प्रचाराच्या नियोजनात मग्न होते.

विधानसभा निवडणुकीत अर्जाची वैधता पूर्ण झाल्यानंतर आलेल्या पहिल्या रविवारच्या सुट्टीचा ‘मुहूर्त’ साधत उमेदवारांनी जास्तीत जास्त कार्यकर्ते व मतदारांच्या संपर्कासाठी सत्कारणी लावला. ‘आॅक्टोबर हीट’मुळे अंगाची लाहीलाही होत असतानाही त्याची पर्वा न करता त्यांनी रॅली व कोपरा सभा घेत प्रचार सुरू ठेवला होता.अणुशक्तीनगर, मानखुर्द-शिवाजीनगर व घाटकोपर (पू.) मतदारसंघातील प्रमुख पक्षांचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते दिवसभर प्रचाराच्या नियोजनात मग्न होते. विभागवार मतदारांची माहिती घेत त्यांना संपर्क साधण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात येत होता. प्रत्यक्ष भेटीगाठीबरोबरच त्यांना फोन व सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. अणुशक्तीनगरमध्ये कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार नवाब मलिक, महायुतीचे तुकाराम काते यांनी सकाळपासून कार्यकर्ते व मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या. मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातील सपाचे अबू आझमी, महायुतीचे विठ्ठल लोकरे, कॉँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुफियान वेणू यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करीत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करीत होते. घाटकोपर (पू.) भाजपचे उमेदवार पराग शहा यांनी मतदारांपेक्षा कार्यकर्त्यांच्या बैठकीवर भर दिला. तिकीट नाकारलेल्या विद्यमान आमदार प्रकाश महेता यांच्या समर्थकांनी शुक्रवारी केलेल्या राडेबाजीमुळे त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले़

टॅग्स :विधानसभा निवडणूक 2019अनुष्की नगरमानखुर्द शिवाजी नगरघाटकोपरघाटकोपर पूर्व