Vidhan Sabha 2019: नवरा कर्जबाजारी, बायको कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 05:17 AM2019-10-06T05:17:54+5:302019-10-06T05:18:31+5:30

कालिदास कोळंबकर सलग सात टर्म आमदारपदी निवडून आले आहेत. २

Vidhan Sabha 2019: husband loaner, wife billionaire | Vidhan Sabha 2019: नवरा कर्जबाजारी, बायको कोट्यधीश

Vidhan Sabha 2019: नवरा कर्जबाजारी, बायको कोट्यधीश

Next

मुंबई : वडाळा विधानसभा मतदारसंघातून तब्बल सात वेळा निवडून आलेले कालिदास कोळंबकर यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत घट झाल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिसून आले आहे. याउलट त्यांच्यावर २७ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज असून, त्यांच्या पत्नी मात्र कोट्यधीश असल्याचे त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.
कालिदास कोळंबकर सलग सात टर्म आमदारपदी निवडून आले आहेत. २०१४ मध्ये त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची जंगम व स्थावर मालमत्ता मिळून ५४ लाख ८५ हजार रुपये संपत्ती होती. तर त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमिनी व फार्म हाउसची किंमत चार कोटी ९२ लाख रुपये होती. मात्र, २०१९ मध्ये कोळंबकर यांच्या संपत्तीमध्ये २७ लाखांची घट झाली, तसेच त्यांच्यावर २७ लाख रुपयांचे कर्ज आहे. २०१४ मध्ये त्यांची जंगम मालमत्ता ४१ लाख रुपये होती. मात्र, २०१९ मध्ये त्यांची जंगम मालमत्ता १४ लाखांवर आली आहे, तर त्यांची स्थावर मालमत्ता पाच वर्षांनंतरही साडेतेरा लाख रुपये आहे. याउलट त्यांच्या पत्नीच्या संपतीमध्ये एक कोटींची वाढ झाली आहे.
या संपत्तीमध्ये मालवण तालुक्यातील चार भूखंड, फार्म हाउस आणि मुंबईतील दोन जागांचा समावेश आहे.

Web Title: Vidhan Sabha 2019: husband loaner, wife billionaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.