Join us

Vidhan Sabha 2019: देव दर्शन अन् ठरविली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 1:05 AM

चेंबूर विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवारांमध्ये सामना होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज वैध ठरल्यानंतर उमेदवार पुढच्या तयारीला लागले आहेत. उमेदवार कार्यालय शोधत आहेत, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन पुढची रणनीती आखत आहेत. मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत आहेत़ काही उमेदवारांनी आपल्या कार्यालयाचे उद्घाटनही केले आहे.चेंबूर विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवारांमध्ये सामना होणार आहे. या १२ उमेदवारांमध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रकाश फातर्फेकर, काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, मनसेचे कर्ण (बाळा) दुनबळे, वंचितचे राजेंद्र माहुलकर यांसह इतर ८ उमेदवारांचा समावेश आहे.यापैकी फातर्फेकर, हंडोरे आणि दूनबळे या उमेदवारांनी देवींचे घेतले. चेंबूर नाका, घाटला, चेंबूर कॅम्प, पीएल लोखंडे मार्ग, लाल डोंगर आदी ठिकाणी उमेदवारांनी भेटी दिल्या. वंचितचे उमेदवार राजेंद्र माहुलकर आरे कॉलनीतील वृक्षतोडीच्या विरोधातील आंदोलनाला उपस्थित होते, तसेच कुर्ला विधानसभेत ७ उमेदवारांमध्ये लढत आहे.यामध्ये शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर, राष्ट्रवादीचे मिलिंद कांबळे, मनसेचे आप्पा आवसरे, सपाचे गंगाराम भोसले यांसह इतर तीन उमेदवारांचा समावेश आहे. यातील कांबळे आणि कुडाळकर यांनीही मतदारसंघातील देवीची दर्शन घेतले. पुढील रणनीतीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली.कलिना विधानसभेतून १४ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय पोतनीस, काँग्रेसचे उमेदवार जॉर्ज अब्राहम, मनसेचे उमेदवार संजय तुर्डे, वंचितच्या मनीषा जाधव यांच्यासह इतर १२ उमेदवारांचा समावेश आहे. पोतनीस त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली़ पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. अब्राहम यांनी आपल्या कार्यालयाचे उद्घाटन केले. आपल्या मतदानावर परिणाम करणाºया उमेदवाराने माघार घ्यावी, यासाठी काही जणांचे प्रयत्न सुरू होते. मंगळवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर कोणामध्ये लढत होईल, याचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :चेंबूरकुर्लाकालिना