Vidhanparishad: सदाभाऊ खोत ऐनवेळी विधानभवनात, उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:28 PM2022-06-09T12:28:30+5:302022-06-09T14:35:33+5:30

या सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Vidhanparishad: Sadabhau Khot will file nomination papers in the Vidhan Bhavan at the right time | Vidhanparishad: सदाभाऊ खोत ऐनवेळी विधानभवनात, उमेदवारी अर्ज दाखल

Vidhanparishad: सदाभाऊ खोत ऐनवेळी विधानभवनात, उमेदवारी अर्ज दाखल

googlenewsNext

मुंबई - राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांना केव्हा नव्हे ती एवढी रंगत आली आहे. भाजपने राज्यसभा निवडणुकांत उमेदवार दिल्याने शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला आहे. तर, विधानपरिषद निवडणुकीसाठीही ऐनवेळी सहावा उमेदवार देत निवडणुकीत राजकीय चुरस निर्माण केली आहे. या सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना भाजपचं समर्थन असणार आहे. 

भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपने या निवडणुकीतही पंकजा मुंडे यांना संधी दिलेली नाही. मात्र, आता सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना मैदानात उतरवले आहे. त्यासाठी, विधानभवनात सदाभाऊ खोत आणि पडळकर यांनी धाव घेतल्याचे दिसून आले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज सकाळी खोत यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, त्याआधीच घडामोडींनी वेग घेतला असून आता सदाभाऊ खोत विधानभवनात पोहोचले आहेत. उमा खापरे यांच्यासोबत त्यांनी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला. खोत यांना सहाव्या जागेसाठी उमेदवार मैदानात उतरवून भाजपने लढत कडवी केली आहे. सदाभाऊ खोत हे अपक्ष उमेदवार असून त्यांना भाजपने समर्थन दिल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

Web Title: Vidhanparishad: Sadabhau Khot will file nomination papers in the Vidhan Bhavan at the right time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.