Join us  

व्हिएतनाम एअरलाइन्सचा पायलट मुंबईतील खड्ड्यांवर नाराज; नारिंगी रंगाने रंगविले

By मनोहर कुंभेजकर | Published: October 02, 2022 8:52 PM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - मुंबईतील रस्त्यांची स्थिती ही रस्त्यात खड्डे,की खड्यात रस्ते आहे.मुंबईत ठिकठिकाणी खड्डे पडले असून यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई-मुंबईतील रस्त्यांची स्थिती ही रस्त्यात खड्डे,की खड्यात रस्ते आहे.मुंबईत ठिकठिकाणी खड्डे पडले असून यामुळे एकीकडे वाहतूक कोंडीला मुंबईकरांना सामोरे जावे लागत असतांना हाडे देखिल त्यांची खिळखिळीत होत आहे. याकडे पालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी यांच्या हद्दीतील खड्डे लवकर बुजवावे आणि यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी  दि, २६ सप्टेंबर पासून दि,४ ऑक्टोबर पर्यंत साजरा होणाऱ्या  नवरात्री २०२२ वॉचडॉग फाउंडेशन कलर गाईडनुसार खड्डे बुजवून नवरात्रीत अनोख्या पद्धतीने खड्डेनवमी  साजरी करत आहे.

आज नवरात्रीच्या सातव्या अंधेरी पूर्व,चकाला,बामणवाडा येथील खड्डे नारंगी रंगाने बुजवले.विशेष म्हणजे या आंदोलनात आपल्या गोरेगावच्या घरी आलेल्या आणि व्हिएतनाम मध्ये स्थायिक असलेले आणि व्हिएतनाम एअरलाइन्समध्ये पायलट म्हणून कार्यरत असलेल्या दयानंद जोशी यांनी वॉचडॉग फाउंडेशनने आयोजित केलेल्या खड्डेनवमीत सहभाग घेऊन नारंगी रंगाने खड्डे रंगवले. रंगवण्यात भाग घेतला आणि मुंबईतील खड्यांबद्धल त्यांनी नाराजी व्यक्त केली. वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अँड.गॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस  आल्मेडा यांनी लोकमतला ही माहिती दिली.

दयानंद जोशी म्हणाले की,मी व्हिएतनाम मध्ये चिन मिन शहरात राहतो. येथे वर्षभर पाऊस पडतो तरी पण तरीही रस्ते व्यवस्थित आहेत.आणि येथील रस्ते देखिल डांबरी असून जर खड्डे पडले तरी ते रात्रीच्या वेळी परत खड्डे पडणार नाही यापद्धतीने बुजवले जातात. मात्र पावसाळ्यात आपण जेव्हा ते गोरेगावला घरी येतो  तेव्हा येथील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून अतिशय वाईट वाटते. येथील दरवर्षी पावसाळ्यात होणारी खड्यांची समस्या हा गंभीर कायमस्वरूपी सोडवण्यात कोणत्याही राजकारण्यांना स्वारस्य नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :मुंबई