लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची मंगळवारी ईडीच्या कार्यालयाने पाच तास चौकशी केली. रात्री साडेआठच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. त्यांना चौकशीसाठी पुन्हा पाचारण केले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
ईडीच्या दिल्लीतून आलेल्या पथकांनी स्थानिक पथकातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सरनाईक यांच्या घरात व कार्यालयात छापे टाकले. तेथून काही दस्तऐवज जप्त केले. त्याचबरोबर विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले. तेथून दक्षिण मुंबईतील बेलार्ड पियर्ड येथील कार्यालयात नेण्यात आले. आधिकाऱ्यांनी त्याच्याकडे आर्थिक व्यवहार, कंपनीतील अन्य भागीदार, त्यांच्या अन्य व्यवसायाबद्दल सखोल विचारणा करण्यात आली. सुमारे पाच तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.