विजय चौगुलेंचा कोपरखैरणेत प्रचार

By admin | Published: October 13, 2014 02:17 AM2014-10-13T02:17:50+5:302014-10-13T02:17:50+5:30

ऐरोली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले यांनी आज वाशी येथील एमजीएम कॉम्प्लेक्स आणि कोपरखैरणे परिसरात प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधला

Vijay Chaugule's Koparkarakaratanee propaganda | विजय चौगुलेंचा कोपरखैरणेत प्रचार

विजय चौगुलेंचा कोपरखैरणेत प्रचार

Next

ऐरोली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले यांनी आज वाशी येथील एमजीएम कॉम्प्लेक्स आणि कोपरखैरणे परिसरात प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या प्रचार दौऱ्याला दोन्ही विभागातील रहिवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उद्या प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. यातच आज रविवार असल्याने चौगुले यांनी शेवटच्या टप्प्यात मतदार संघ पिंजून काढला. वाशी विभागातील एमजीएम कॉम्प्लेक्स आणि जुहूगाव परिसरात भव्य रॅली काढून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी कोपरखैरणे परिसरात रॅली काढून आपले शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत मोटरसायकल्स, चारचाकी वाहनांसह शिवसैनिकांचा मोठा ताफा पहावयास मिळाला. विशेषत: महिला कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. युवा वर्गाचा सहभागही तितकाच लक्षणीय असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Vijay Chaugule's Koparkarakaratanee propaganda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.