'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 05:17 PM2024-05-14T17:17:31+5:302024-05-14T17:30:56+5:30

Vijay Wadettiwar Ghatkopar Hoarding Collapse Updates: सरकार, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पापांचा जीव गेल्याचाही केला आरोप

Vijay Wadettiwar says Ghatkopar Hoarding collapse incidence happened due to corruption in Maharashtra Govt | 'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

Ghatkopar Hoarding Collapse Updates: सोमवारी संध्याकाळच्या वेळी जोरदार वारा आणि पाऊस यामुळे मुंबईतील घाटकोपर येथे एक मोठी दुर्घटना घडली. महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून त्याखाली दबून सुमारे १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्योरांचे युद्ध सुरु झाले आहे. "होर्डिंग दुर्घटनेला महायुती सरकार जबाबदार आहे. सरकारच्या भोंगळ कारभारामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप माणसांचा जीव गेला. 'चंदा लो, धंदा दो' अशा पद्धतीने महायुतीचा कारभार सुरु असल्यामुळे अशा घटना घडत आहेत," असा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांनी घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

विजय वडेट्टीवार म्हणाले, "घाटकोपरची घटना हादरवून सोडणारी आहे. ही घटना प्रशासनाच्या आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे झाली आहे. मुंबईचे पालकमंत्री पालिकेत निधी वाटप करायला बसतात. पण अशा घटनांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. एवढे मोठे होर्डिंग का उभे केले जाते याकडे कोणाचे लक्ष नाही. महानगर पालिकेचे अधिकारी काय करतात हा प्रश्न आहे. फक्त टक्केवारीत सगळे अडकले आहेत. जबाबदारीतून  कोणाला पळ  काढता  येणार नाही. अधिवेशनात आम्ही हा विषय  लावून धरणार आहे. मृत्यूची संख्या 14 पेक्षा जास्त असल्याचं आम्हाला समजलं आहे. यासंदर्भातील तक्रादारांचा अर्ज जिल्हाधिकारीअमान्य करतात यावरून प्रशासन किती गंभीर आहे हे लक्षात येते."

विजय वडेट्टीवार यांनी राजावाडी येथील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना दिलेली मदत वाढविली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली.

Web Title: Vijay Wadettiwar says Ghatkopar Hoarding collapse incidence happened due to corruption in Maharashtra Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.