Join us

विज्ञानगंगा व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:05 AM

मुंबई : मराठी विज्ञान परिषद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त सौजन्याने विज्ञानगंगा या व्याख्यानमालेत कोरोना आणि विज्ञान ...

मुंबई : मराठी विज्ञान परिषद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त सौजन्याने विज्ञानगंगा या व्याख्यानमालेत कोरोना आणि विज्ञान या विषयावर डॉ. आर.एम. पारीख (संचालक, औषधशास्त्र विभागाचे आणि प्रमुख न्यूरॉलॉजी, जसलोक रुग्णालय, मुंबई) यांचे व्याख्यान होणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता लाइव्ह होणारे हे व्याख्यान विनामूल्य आहे.

-------------

शेतीविषयक पुरस्कार

मुंबई : कृषिक्षेत्रात उपयुक्त आणि नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थेला प्रोत्साहन म्हणून मराठी विज्ञान परिषदेतर्फे वसंतराव नाईक आणि बळीराजा-अण्णासाहेब शिंदे कृषी हे पुरस्कार दर तीन वर्षांनी दिले जातात. इच्छुकांनी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज पाठवावेत. अधिक माहितीसाठी मराठी विज्ञान परिषद, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई येथे संपर्क साधावा.

-------------

रस्ते सुरक्षा मोहीम

मुंबई : लेझी रेंजर्स मोटारसायकलिस्ट कॉन्फेडरेशन या संस्थेने पोलिसांच्या सहाकार्याने सुरू असलेल्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा योजनेंतर्गत मोहीम पार पडली. यात रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियम यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. ३० हून अधिक स्वयंसेवक परिवारासमवेत एक दिवस पोलिसांसोबत या पोलिसांमार्फत आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी ज्या लोकांनी वाहतूक नियमांचे पालन केले त्यांचे पोलिसांमार्फत थँक यू कार्ड आणि जबाबदार नागरिक म्हणून एक बॅज देऊन कौतुक करण्यात आले.