अखेर सत्यासमोर सरकार झुकले! - विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 03:32 PM2018-07-06T15:32:51+5:302018-07-06T15:37:42+5:30

सरकारला अखेर सत्यासमोर झुकावेच लागले असून नवी मुंबईतील सिडको जमीन व्यवहाराला मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती हे विरोधी पक्षांचे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

vikhe patil slams state government on navi mumbai land scam | अखेर सत्यासमोर सरकार झुकले! - विखे पाटील

अखेर सत्यासमोर सरकार झुकले! - विखे पाटील

Next

मुंबई : सरकारला अखेर सत्यासमोर झुकावेच लागले असून नवी मुंबईतील सिडको जमीन व्यवहाराला मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती हे विरोधी पक्षांचे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सिडको घोटाळ्यातील व्यवहाराला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे आम्ही केलेल्या आरोपांमध्ये तथ्य होते, हे अधोरेखित झाले. या व्यवहारात जनतेच्या तिजोरीवर सुमारे 2 हजार कोटींचा दरोडा घातला गेला. या व्यवहारात काही विशिष्ट मंडळींची घरे भरण्याचे कारस्थान होते, हे कागदपत्रांवरून स्पष्टपणे दिसून येत होते. सरकारने हा व्यवहार स्थगीत केला नसता तर न्यायालयीन चौकशीत नामुष्की पत्करण्याची वेळ सरकारवर हमखास ओढवली असती. या घोटाळ्यातील आणखी काही दस्तावेज आम्ही सभागृहात मांडणार होतो. आजपासून यासंदर्भात रोज आमदारांची निदर्शनेही करण्याची रणनिती आम्ही आखली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासूनच विरोधी पक्षांचे आमदार आक्रमकही झाले होते. त्यामुळे सरतेशेवटी या व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारला घ्यावाच लागला. हा सत्याचा आणि विरोधी पक्षांचा मोठा विजय आहे, असेही राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले.
 

Web Title: vikhe patil slams state government on navi mumbai land scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.