Join us

विक्रोळीतून ४५ लीटर गावठी दारू जप्त

By admin | Published: June 05, 2016 1:21 AM

मालवणी दारूकांडानंतर शहरातील आणि शहराबाहेरील गावठी दारूच्या भट्ट्यांपासून गुत्यांपर्यंत सर्व नेटवर्क पोलिसांनी उद्ध्वस्त केले होते. मात्र, आजही गावठी दारूची नेमक्या गुत्त्यांवर पुरवठा होत

मुंबई : मालवणी दारूकांडानंतर शहरातील आणि शहराबाहेरील गावठी दारूच्या भट्ट्यांपासून गुत्यांपर्यंत सर्व नेटवर्क पोलिसांनी उद्ध्वस्त केले होते. मात्र, आजही गावठी दारूची नेमक्या गुत्त्यांवर पुरवठा होत असल्याचे, भांडुप पाठोपाठ विक्रोळी पार्क साइट पोलिसांनी केलेल्या गावठी दारूच्या कारवाईतून उघडकीस आले. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह मल्लेश पुजारीला पार्क साइट पोलिसांनी अटक केली आहे. अंधेरी येथील रहिवासी असलेला १७ वर्षीय तरुणाने कांजुर रेल्वेस्थानक परिसरातून रिक्षा पकडली. दरम्यान, तरुणाच्या हातातील पिशवी पाहून तेथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस शिवाजी गीतेंना संशय आला. त्यांनी त्याची पाहणी केली असता, त्यात गावठी दारू असल्याचे निष्पन्न झाले. गीतेंनी तरुणाला पार्क साइट पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी परिसरात गावठी दारू विकणाऱ्या पुजारीकडे हा तरुण काम करत होता. शुक्रवारी दुपारी कांजूर स्थानकावरून रिक्षाने अंधेरीतील पुजारीच्या दारूविक्री केंद्रावर जात होता. त्याच दरम्यान, दुपारी अडीचच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. शनिवारी मुख्य आरोपी पुजारीलाही अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पार्क साइट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी दिली.