Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 02:49 PM2024-11-23T14:49:24+5:302024-11-23T14:53:06+5:30
Vikhroli Vidhan Sabha Result 2024 News: विक्रोळी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील राऊत आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सुवर्णा कारंजे यांच्या लढत होती. या मतदारसंघात मनसेने भरपूर मते घेतली.
Vikhroli Vidhan Sabha Result 2024 Updates: विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. विक्रोळी विधानसभा मतदारसंघा शिवसेना विरुद्ध शिवसेना (UBT) असा यांच्या लढाई होती. या मतदारसंघात सुनील राऊत विजय झाले असून, घोषणेची औपचारिकता बाकी आहे. सुनील प्रभू यांना शेवटच्या म्हणजे १९ व्या फेरी अखेर ६५ हजार ७१५ मते मिळाली.
विक्रोळी विधानसभा मतदारसंघात सुनील राऊत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध सुवर्णा कारंजे (शिवसेना) यांच्यात लढत होती. या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विश्वजित ढोलम हे निवडणुकीच्या मैदानात होते. तर वंचित बहुजन आघाडीचे अजय खरात हे देखील उमेदवार होते.
विक्रोळी विधानसभा मतदारसंघ, कोणाला किती मिळाली मते?
ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील राऊत यांना ६५ हजार ७१५ मते मिळाली आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या सुवर्णा कारंजे ५० हजार ३६३ मते मिळाली. त्याचबरोबर मनसेचे उमेदवार विश्वजित ढोलम यांना १७ हजार ७१६ मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे अजय खरात यांना ३ हजार ४१८ मते मिळाली आहेत.
मनसे फॅक्टरचा शिंदेंच्या शिवसेनेला फटका?
विक्रोळी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवाराचा थेट फटका महायुतीच्या उमेदवाराला बसल्याचे दिसत आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा कारंजे १५ हजार ३५२ मतांनी मागे राहिल्या. तर मनसेचे उमेदवार ढोलम यांना १६ हजार ७१६ मते मिळाली आहे.
२०१९ मध्ये काय झाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचंड बहुमतासह लोकसभेत सत्ता स्थापन केल्याचा फायदा राज्य भाजपलाही झाला. यावेळी भाजपचा स्ट्राइक रेट थेट ४७ वरून ६४ वर गेला, तर शिवसेनेचाही स्ट्राइक रेट २२ वरून थेट ४५ वर गेला. यावेळी काँग्रेस ३०, तर राष्ट्रवादीही ४४ या स्ट्राइक रेटवर पोहोचली.
२०१४ मध्ये काय झाले?
शिवसेनेचा स्ट्राइक रेट सतत घसरत राहिला. याच वेळी भाजपच्या स्ट्राइक रेटमध्ये ७ टक्क्यांची वाढ झाली. पंतप्रधान मोदींनी एक हाती सत्ता मिळविल्याचा फायदा भाजपला राज्यात झाला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्ट्राइक रेटमध्येही यावेळी घट झाली. भाजपचा स्ट्राइक रेट थेट ४७% वरून ६४% वर गेला.
२००९ मध्ये काय झाले?
काँग्रेसच्या जागांमध्ये यावेळी चांगली वाढ झाली. काँग्रेस जवळजवळ स्थिर राहिली. काँग्रेस-राष्ट्रवादीला २१/११ हल्ल्याचा आणि सत्ताविरोधी लाटेचा थोडा फटका बसला. २००९ ला भाजपच्या जागांत काही प्रमाणात घट झाली होती.