विकोचे संजीव पेंढारकर यांना ग्लोबल ॲप्रीसिएशन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:08 AM2021-08-28T04:08:32+5:302021-08-28T04:08:32+5:30

मुंबई : विको हर्बल उत्पादनांचे उत्पादक उद्योगपती संजीव पेंढरकर यांना ग्लोबल ॲप्रीसिएशन पुरस्कार प्राप्त झाला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय ...

Viko's Sanjeev Pendharkar receives Global Appreciation Award | विकोचे संजीव पेंढारकर यांना ग्लोबल ॲप्रीसिएशन पुरस्कार

विकोचे संजीव पेंढारकर यांना ग्लोबल ॲप्रीसिएशन पुरस्कार

Next

मुंबई : विको हर्बल उत्पादनांचे उत्पादक उद्योगपती संजीव पेंढरकर यांना ग्लोबल ॲप्रीसिएशन पुरस्कार प्राप्त झाला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कला शिक्षण अकॅडमीने विशेष मार्गदर्शनपर भाषणाचे आयोजन केले होते. यावेळी संजीव पेंढरकर यांनी भारतीय प्रेक्षकांसमोर विशेष मार्गदर्शनपर भाषण सादर केले. त्यानंतर, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

या वेबिनारमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या भारतीय कलेच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता, यावेळी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही उपस्थित होते. भारतातील मुलांना कलाक्षेत्रात प्रोत्साहन मिळावे, यासाठी अखिल भारतीय बालकाला प्रदर्शन सोसायटी आणि नवभारत राष्ट्रीय ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलत होते.

विको भारतातील आयुर्वेदिक उत्पादने बनविणारे एक महत्त्वाचे उत्पादक आहे. देश-विदेशात विकोचे उत्पादन वापरण्यात येत आहेत. विको लॅबोरेटरीजमध्ये स्वच्छतेचे पालन करून उत्पादने घेतली जातात. हर्बल पेस्ट पावडर, फेस क्रीम, फेस वॉश अशा अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये हळद व चंदन तेल या आयुर्वेदिक घटकांचा उपयोग केला जातो. म्हणूनच विको उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असल्याचे पेंढरकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Viko's Sanjeev Pendharkar receives Global Appreciation Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.