विक्रम फडणीस दिग्दर्शनात उतरला
By Admin | Published: November 13, 2014 01:04 AM2014-11-13T01:04:11+5:302014-11-13T01:04:11+5:30
प्रसिद्ध मराठमोळा फॅशन डिझायनर विक्रम फडणीस याच्या फॅशन डिझायनिंगच्या कारकिर्दीने नुकतेच रजतजयंती वर्ष साजरे केलेय.
मुंबई : प्रसिद्ध मराठमोळा फॅशन डिझायनर विक्रम फडणीस याच्या फॅशन डिझायनिंगच्या कारकिर्दीने नुकतेच रजतजयंती वर्ष साजरे केलेय. विशेष म्हणजे फॅशन डिझायनिंगच्या एक पाऊल पुढे जात आता त्याने चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केले असून, त्याच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाचे नाव ‘निया’ आहे. बिपाशा बसू आणि राणा डुगुबट्टीची मुख्य भूमिकांसाठी निवड केली आहे.
नियाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विक्रम फडणीससह बिपाशा, राणा डुगुबट्टी, गीतकार समीर, संगीतकार शंकर-अहसान लॉय तसेच दोन नवे निर्माते अमित सुरी व आशिष मेहरोत्र उपस्थित होते. नियाच्या कथेबद्दल सांगताना विक्रम याने स्पष्ट केले की, ही कथा कौटुंबिक असून बॉक्स ऑफिसची सध्याची 1क्क्-2क्क् कोटींसारखी कोटीच्या कोटी उड्डाणो याचा नियासाठी विचार केलेला नाही.
विक्रमने वरिष्ठ गीतकार समीर पांडे यांचा उल्लेख आवजरून करताना सांगितले की, मी गेली अनेक वर्षे माङया सिनेमासाठी निर्माता मिळावा म्हणून प्रयत्नशील होतो, पण संपर्क यादीतील कुणीही निर्माता म्हणून पुढे आला नाही. समीर यांनी माङयासाठी आपणहून पुढाकार घेतला आणि त्यांच्याच अथक प्रयत्नांमुळे आज निया सिनेमाच्या निर्मितीचे माङो स्वप्न साकार होतेय.
बिपाशा बसू ते सलमान खान आणि माधुरी दीक्षित ते काजोल, सुश्मिता सेन अशा अनेक सेलीब्रिटीजची रुपेरी कारकीर्द विक्रम फडणीसने त्याच्या सजर्नशील कॉस्च्युम्सने उजळवून टाकली आहे. विक्रमने जगभर केलेल्या फॅशन शोजना, त्याच्या वैविध्यपूर्ण आणि कल्पकतेने भरलेल्या पोशाखांना मान्यता तर मिळालीच आहे, पण त्याच्या फॅशन शोजमध्ये शो स्टॉपर म्हणून मिरवणारे बॉलीवूडचे हेच स्टार्स त्याच्या पहिल्या निर्मितीसाठी पुढे येऊ शकत नाहीत, हे विक्रम फडणीसचे दुर्दैव. बॉलीवूडच्या कार्यक्रमांना ज्याला-त्याला मिठय़ा मारत मैत्रीचे अवडंबर करणारी फिल्मी दुनिया कधीच कुणाशी एकनिष्ठ राहू शकत नाही. ना त्यात मैत्रीचे खरे नाते असते.. हीच शोकांतिका यानिमित्ताने पुन्हा एकदा सामोरी येतेय.
चंदेरी दुनियेतल्या सूत्रंकडून समजते की, विक्रम फडणीसने सिनेमाच्या दिग्दर्शनाचा विचार 2क्क्7-क्8 मध्येच केला होता. त्या काळात विक्रमने माधुरी दीक्षितला घेऊन चित्रपट काढण्याचा मनसुबा व्यक्त केला होता. पण, सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतरही विक्रमचा पहिला चित्रपट माधुरीला नव्हे तर बिपाशा बसूला घेऊन निर्माण होतोय, हेही नसे थोडके. ‘निया’साठी आपण स्वत: कॉस्च्युम करणार नसल्याचे विक्रमने स्पष्ट केले. बिपाशाची वैयक्तिक स्टायलिस्ट
तिला नियामध्ये लूक देणार असल्याचेही विक्रमने जाहीर केले. कोरियोग्राफर ते फिल्म डायरेक्टर व्हाया फॅशन डिझायनिंग असा पल्ला गाठलेल्या विक्रमच्या निया सिनेमाबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)