पिसाळलेल्या कुत्र्याने केली ग्रामस्थांची दमछाक
By admin | Published: July 31, 2014 12:45 AM2014-07-31T00:45:49+5:302014-07-31T00:45:49+5:30
पाली बाजारपेठेतील पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या कुत्र्याने आतापर्यंत अनेकांना चावा घेतला आहे
पाली : पाली बाजारपेठेतील पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या कुत्र्याने आतापर्यंत अनेकांना चावा घेतला आहे. पाली शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या खूपच वाढली असून प्रशासनाने त्यांना पकडून निर्जनस्थळी सोडले पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यत साऱ्यांना या कुत्र्यांचा त्रास होण्याचा धोका आहे. आशिष हजारे यांना चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले होते. याबाबत सरपंच राजेश मपारा यांनी सांगितले, पूर्वी मोकाट, भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मारले जात असत. परंतु आता हे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. तरीही याबाबत महसूल व पोलीसयंत्रणा यांचेकडे पंचायतीमार्फत अर्ज करण्यात येईल. शाळा, महाविद्यालय, गर्दीची ठिकाणे आदी ठिकाणी नागरिकांना व विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा देण्याच्या सूचना दिल्या जातील, असे मपारा यांनी सांगितले. (वार्ताहर)