Join us

डीसी रुलमध्ये दुरुस्ती केल्यास कोळीवाड्यांसह गावठाणांना चटई क्षेत्रफळाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:09 AM

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाडे, गावठाणांचा विकास करण्यासाठी एसआरएऐवजी डीसी रुलमध्ये दुरुस्ती करण्यात यावी. असे केल्यास कोळीवाडे ...

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाडे, गावठाणांचा विकास करण्यासाठी एसआरएऐवजी डीसी रुलमध्ये दुरुस्ती करण्यात यावी. असे केल्यास कोळीवाडे आणि गावठाणांचा नीटनेटका विकास होईल, विशेषत: डीसी रुलमध्ये दुरुस्ती करून विकास केल्यास संबंधिताना चटई क्षेत्रफळाचा लाभ होईल, अशी माहिती वॉचडॉग फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष गॉडफ्रे पिमेंटा यांनी दिली.

नवी मुंबईने आपल्या डीसी रुलमध्ये दुरुस्ती करत तेथील गावठाणे आणि कोळीवाड्यांना दिलासा दिला असेल तर मुंबई महापालिकेसह सरकारला याबाबत सकारात्मक विचार करण्यास काहीच हरकत नाही; आणि तसे त्यांनी केले पाहिजे, असे म्हणणेदेखील गॉडफ्रे पिमेंटा यांनी मांडले तर दुसरीकडे मुंबईमध्ये असणाऱ्या गावठाणांमध्ये राहणारे लोक खऱ्या अर्थाने भूमिपुत्र असल्याने गावठाणांचा विकास हा एसआरएच्या माध्यमातून होणार नाही. त्यासाठी डीसी रुल्समध्ये बदल करावा लागला तरी चालेल, असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केले होते. महाराष्ट्र ख्रिश्चन फोरम आणि मुंबई काँग्रेस यांच्यामध्ये नुकतेच आयोजित एका परिसंवादात ते बोलत होते.