विनय चोबे यांना अप्पर महासंचालकपदी बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 01:27 AM2020-04-19T01:27:25+5:302020-04-19T01:28:00+5:30

चोबे गेल्या ७ एप्रिलपासून मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची धुरा सांभाळीत आहेत. त्यांना कोरोनाचा लॉकडाउन संपल्यानंतर कोठे पोस्टिंंग दिली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारे आहे.

Vinay Chobe promoted as Director General | विनय चोबे यांना अप्पर महासंचालकपदी बढती

विनय चोबे यांना अप्पर महासंचालकपदी बढती

googlenewsNext

मुंबई : कोविड-१९ च्या प्रादुर्भावाला सामोरे जाण्यासाठी सर्व व्यस्त असताना गृह विभागाने सहआयुक्त (कायदा व सुव्यस्था) विनय चोबे यांची अप्पर महासंचालक म्हणून पदोन्नती केली आहे. सध्या तेच पद तात्पुरता स्वरूपात पदोन्नत करून त्यांना तेथेच बढती देण्यात आलेली आहे.

चोबे गेल्या ७ एप्रिलपासून मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची धुरा सांभाळीत आहेत. त्यांना कोरोनाचा लॉकडाउन संपल्यानंतर कोठे पोस्टिंंग दिली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारे आहे. शुक्रवारी गृह विभागाने त्याच्या बढतीचे आदेश जारी केले.

चोबे मूळचे बिहार केडरचे असून ते १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मितभाषी व कामाला महत्त्व देणारे अधिकारी म्हणून त्याची ओळख आहे. कोरोनाचे संकट टळेपर्यंत त्यांच्याकडे ‘लॉ अ‍ॅण्ड आॅर्डर’ची धुरा असेल, नव्या बदलामध्ये या ठिकाणी अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असे सांगण्यात आले.

अन्य तिघांना करावी लागणार प्रतीक्षा
विनय चोबे यांच्या पाठोपाठ अमितेशकुमार (एसआयडी), नवल बजाज (सहआयुक्त प्रशासन) आणि प्रवीण साळुंखे (सीआयडी) यांच्या पदोन्नतीबाबत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पदोन्नती समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. शुक्रवारी मात्र चोबे यांच्या एकट्याच्याच बढतीचा आदेश त्याच पदावर काढण्यात आला.

यशस्वी यादव यांची सायबर पोलीस आयजीपदी नियुक्ती
गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेले महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी यशस्वी यादव यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत गृह विभागाच्या वतीने शनिवारी आदेश काढण्यात आले. गेल्या वर्षभरापासून यादव हे राज्य गुप्तवार्ता विभागात विशेष सुरक्षा विभागात कार्यरत होते. त्यापूर्वी औरंगाबाद येथे आयुक्त म्हणून कार्यरत असताना ते वादग्रस्त ठरले होते. एका प्रकरणात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून पदभार काढून घेण्यात आला होता.

Web Title: Vinay Chobe promoted as Director General

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.