शिवस्मारक समितीवरून विनायक मेटेंना हटवा!

By admin | Published: January 10, 2017 07:07 AM2017-01-10T07:07:05+5:302017-01-10T07:07:05+5:30

शिवस्मारक समितीचे पुनर्गठन करावे तसेच समितीच्या अध्यक्षपदावरुन आमदार विनायक मेटे यांची हकालपट्टी करण्याची मागणी विविध मराठा संघटनांनी केली आहे.

Vinayak Mena to remove Shivamankar committee! | शिवस्मारक समितीवरून विनायक मेटेंना हटवा!

शिवस्मारक समितीवरून विनायक मेटेंना हटवा!

Next

मुंबई : शिवस्मारक समितीचे पुनर्गठन करावे तसेच समितीच्या अध्यक्षपदावरुन आमदार विनायक मेटे यांची हकालपट्टी करण्याची मागणी विविध मराठा संघटनांनी केली आहे.
मराठा समाजाच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. एकूण ४३ मराठा समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजेरी लावली होती. छावा संघटना, मराठा आरक्षण समन्वय समिती, ताराराणी ब्रिगेड प्रदेश, शंभूराजे युवा क्रांती संघटना, शेतकरी मराठा सेवा संघ यासारख्या संघटनांचा समावेश होता. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यावर मराठा समाजाने आक्षेप घेतला आहे. समितीचे गठन झाले असले तरी मेटे यांनी काम केले नाही. समितीच्या कामात मराठा संघटनांना सामील करुन घेण्यात आले नाही.
मेटेंची कार्यपद्धत मान्य नसल्याच्या मराठा समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. विनायक मेटे यांनी शिवस्मारक भूमीपूजनच्या वेळी नाराजी नाट्य केले. मात्र अडीच वर्षात त्यांनी स्वत: याबाबत एकही बैठक घेतली नाही. मराठा समाज संघटनांना विश्वासात घेतले नाही, असा दावा बैठकीत करण्यात आला.(प्रतिनिधी)

Web Title: Vinayak Mena to remove Shivamankar committee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.