Vinayak Mete Accident: भीषण! महामार्ग पोलीस प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितला प्रसंग, नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 08:35 AM2022-08-14T08:35:55+5:302022-08-14T11:06:56+5:30

अपघात ठिकाणापासून 6.4 किमी अंतरावर असलेल्या पळस्पे महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी गणेश बुरकूल यांनी माहिती दिली.

Vinayak Mete Accident: Terrible! The officer in charge of highway police told what exactly happened on khopoli road accident of vinayak mete | Vinayak Mete Accident: भीषण! महामार्ग पोलीस प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितला प्रसंग, नेमकं काय घडलं

Vinayak Mete Accident: भीषण! महामार्ग पोलीस प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितला प्रसंग, नेमकं काय घडलं

googlenewsNext

मुंबई/बीड - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे मुंबई लेनवर किमी नं.km15/900 येथे रसायनी पोलीस ठाणे हद्दीत हा प्राणांतिक अपघात घडलेला आहे. यासंदर्भात महामार्ग पोलीस प्रभारी अधिकारी गणेश बुरकूल यांनी माहिती दिली. तसेच, अपघाताची माहिती मिळताच 7 मिनिटांत आपण अपघातस्थळी पोहोचलो होतो, असेही त्यांनी सांगितले. 

अपघात ठिकाणापासून 6.4 किमी अंतरावर असलेल्या पळस्पे महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी गणेश बुरकूल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाता झाल्याची माहिती या केंद्रावरील पोलिसांना पहाटे 05.58 वाजता मिळाली, त्याक्षणी त्यांनी धाव घेत 6.05 वाजता अपघातस्थळ गाठले होते. त्यानंतर, मदताकार्य सुरू झाले. 

नमूद वेळी व तारखेस फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 चालक एकनाथ कदम हे माजी आमदार विनायक मेटे (केज-बीड) यांना घेऊन मुंबई बाजूकडे दुसरे लेनने जात असताना कार चालक यांचा त्यांच्या गाडीवरील ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला. सदर अपघातात आमदार विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी ॲम्बुलन्स एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचाराकामी दाखल केले. यावेळी, येथील डॉ. धर्मांग यांनी तपासून विनायक मेटेंना मृत घोषित केले आहे. 

अपघातातील जखमी बॉडीगार्ड पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने कारमधून बाहेर काढून आय आर बी रुग्णवाहिकेने तात्काळ MGM हॉस्पिटल, कामोठे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहेत. कार आयआरबी क्रेनच्या साह्याने रस्त्याचे बाजूला घेतली आहे. सदरवेळी आम्ही  व PSI चव्हाण, तसेच रसायनी पोलीस स्टेशन एपीआय बालवडकर व   स्टाफ तसेच आयआरबीचे नवनाथ गोळे  आणि स्टाफ हजर होते. सदर अपघाताची माहिती रसायनी पोलीस स्टेशनला दिली आहे, अशी माहिती बुरकूल यांनी दिली. 
 

Web Title: Vinayak Mete Accident: Terrible! The officer in charge of highway police told what exactly happened on khopoli road accident of vinayak mete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.