Vinayak Mete: "मराठा चळवळीचा नेता हरपला, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही घडले"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 09:20 AM2022-08-14T09:20:58+5:302022-08-14T09:33:00+5:30

Vinayak Mete: विनायक मेटे हे चळवळीतील नेते होते, मराठा आरक्षणासाठी त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा लढा सुरू होता

Vinayak Mete: "Maratha movement leader lost, Pankaja Munde on Vinayak mete Accident death | Vinayak Mete: "मराठा चळवळीचा नेता हरपला, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही घडले"

Vinayak Mete: "मराठा चळवळीचा नेता हरपला, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही घडले"

Next

मुंबई - शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ शिवसंग्राम पक्षाचे मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मेटे यांना मुंबईला हलविण्याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. मात्र, डॉक्टरांनी त्यांना निधन झाल्याची कल्पना दिली. डॉ. धर्मांग यांनी मेटे यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. या घटनेनं महाराष्ट्रासह बीड जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. बीडच्या माजीमंत्री पंकजा मुंडें यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. 

विनायक मेटे हे चळवळीतील नेते होते, मराठा आरक्षणासाठी त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा लढा सुरू होता. त्यामुळे, मराठा समाजासाठी आणि मराठा आरक्षण आंदोलकांनाही या घटनेनं मोठं दु:ख झालं आहे. या निधनाची बातमी कळताच अनेकांनी एकमेकांशी फोनवरुन संपर्क केला, तर काहींनी बीडहून मुंबईकडे धाव घेतल्याचे समजते. बीडच्या माजी पालकमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही ट्विट करुन या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

''दुर्दैवी अपघातात निधन झाल्याने विनायकराव मेटेंसारख्या सतत चळवळीत काम करणार्‍या नेत्याला महाराष्ट्र मुकला. मी त्यांना 22-23 वर्षे पाहते आहे, कुठल्याही कौटुंबिक पार्श्वभूमीविना राजकारणात स्वतःच्या बुद्धी आणि कौशल्यच्या जीवावर उभा असणारा हा नेता. आज मराठा चळवळीतील नेता हरपला, अशी भावनिक प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे. तसेच, भावपूर्ण श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. 

मराठा आरक्षणाच्या बैठकीला निघाले होते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे मुंबईला निघाले होते. बीडमध्ये आज एक कार्यक्रमही होता, तो थांबवून मेटे मुंबईला निघाले होते. रात्रीच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मी मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मुंबईला जात असल्याचे म्हटले होते.
 

Web Title: Vinayak Mete: "Maratha movement leader lost, Pankaja Munde on Vinayak mete Accident death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.