Join us

एकदा गेलेली कीड परत नको; शिंदे गटातील आमदारांवर विनायक राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 4:16 PM

बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे.

मुंबई: बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे. महाविकास आघाडीमधील पदाधिकाऱ्यांवर खोट्या केस केल्या जात असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला. 

"माग सरकवले म्हणून विनयभंगची केस दाखल करणे म्हणजे मॅनीप्युलेट करणे सुरू आहे. नेत्यांना सध्या नाहक त्रास दिला जात आहे. पालघरमध्येही दोन दिवसापूर्वी अशीच घटना समोर आली आहे. सध्याच्या सरकारने घाणीरडी वृत्ती राजकारणात सुरू आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी शिंदे गटावर केला. 

 

Jitendra Awhad Video: जामीन मिळाला.... विनयभंग प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा

अब्दुल सत्तार यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी पांघरुन घातले आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई केली असती, पण सध्या अस काहीही झालेले नाही. ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. राजन विचारेंवर त्यामुळे केस केली आहे, असंही खासदार राऊत म्हणाले. 

गेल्या काही दिवसापासून दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात काल एका महिनेले विनयभंगाची तक्रार दाखल केली होती, आव्हाड यांच्याकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. आज या संदर्भात ठाणे न्यायलयात सुनावणी झाली. यात आव्हाड यांना जामीन मंजूर केला आहे. 

टॅग्स :विनायक राऊत शिवसेनाएकनाथ शिंदे