Join us

लेखक भारत सासणे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 1:09 PM

राज्य सरकारच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून आगामी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी पुरस्कारांची घोषणा केली.

मुंबई : राज्य सरकारच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून आगामी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी पुरस्कारांची घोषणा केली.जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रु. रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. श्री. पु. भागवत पुरस्कार (२०२१) लोकवाङ्मय गृह, मुंबई, या संस्थेला जाहीर झाला आहे. तीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आला. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (२०२१, व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाला आहे. डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद, पुणे, तर कविवर्य मंगेश पाडगावंकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना जाहीर झाला आहे.स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली. हे पुरस्कार विजेते असे : वाङ्मय : कवी केशवसुत पुरस्कार - हेमंत दिवटे, प्रथम प्रकाशन काव्य बहिणाबाई चौधरी पुरस्कार - राजीव देसले, नाटक एकांकिका : राम गणेश गडकरी पुरस्कार - जयंत पवार, कादंबरी : ह. ना. आपटे पुरस्कार - भीमराय वाघचौरे, प्रथम प्रकाशन कादंबरी : श्री. ना. पेंडसे पुरस्कार - अविनाश उषा वसंत, लघुकथा : दिवाकर कृष्ण पुरस्कार - माधव जाधव, प्रथम प्रकाशन लघुकथा ग. ल. ठोकळ पुरस्कार - रुस्तम होनाळे, ललित गद्य : अनंत काणेकर पुरस्कार - अरुण खोपकर, प्रथम प्रकाशन ललित गद्य : ताराबाई शिंदे पुरस्कार - डॅनियल फ्रान्सिस मस्कारन्हेस, विनोदी लिखाण : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार - सॅबी परेरा, प्रौढ वाङ्मय चरित्र : न. चिं. केळकर पुरस्कार - डॉ. अक्षयकुमार काळे, आत्मचरित्र : लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार - डॉ. शाहू रसाळ, समीक्षा : श्री. के. क्षीरसागर पुरस्कार - गंगाधर पाटील, राज्यशास्त्र : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार - उत्तम कांबळे, इतिहास : शाहू महाराज पुरस्कार - शशिकांत पित्रे, भाषाशास्त्र : नरहर कुरुंदकर पुरस्कार - औदुंबर सरवदे, विज्ञान व तंत्रज्ञान : महात्मा जोतिराव फुले पुरस्कार - डॉ. बाळ फोंडके, उपेक्षितांचे साहित्य : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार - अनंत केदारे, तत्त्वज्ञान व मानसशास्र : ना. गो. नांदापूरकर पुरस्कार - डॉ. शोभा पाटकर, शिक्षणशास्र : कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार - डॉ. राणी बंग व करुणा गोखले, पर्यावरण : डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार - डॉ. मृदुला बेळे, संपादन : रा. ना. चव्हाण पुरस्कार - राम जगताप व भाग्यश्री भागवत, अनुवाद : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री पुरस्कार - मिलिंद चंपानेरकर, वाड्मय संकीर्ण : भाई माधवराव बागल पुरस्कार - धनंजय जोशी, बालवाङ्मय कविता बालकवी पुरस्कार - एकनाथ आव्हाड, बालवाङ्मय नाटक भा. रा. भागवत पुरस्कार - शशिकांत पाताडे, बालवाङ्मय कादंबरी साने गुरुजी पुरस्कार - डॉ. श्रीकांत पाटील, बालवाङ्मय कथा राजा मंगळवेढेकर पुरस्कार - वसीमबारी मणेर, बालवाङ्मय सर्वसामान्य ज्ञान यदुनाथ थत्ते पुरस्कार - किशोर माणकापुरे, बालवाङ्मय संकीर्ण ना. धो. ताम्हणकर पुरस्कार - डॉ. वैशाली देशमुख, सरफोजीराजे भोसले बृह्न्महाराष्ट्र सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार - गजानन यशवंत देसाई.

‘लोकमत’मधील लेखनाचा सन्मानधनंजय जोशी हे झेन साधक गेली अनेक वर्षे अमेरिकेत वास्तव्यास आहेत. झेन तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेली मूलभूत सूत्रे सहज सोप्या रसाळ पद्धतीने उलगडून सांगणारे त्यांचे ‘सहज’ हे अल्पाक्षरी सदर काही वर्षे लोकमतच्या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाले. रोहन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाला यंदाचा भाई माधवराव बागल राज्य वाङ्मयीन पुरस्कार जाहीर झाला आहे.

टॅग्स :मुंबईमराठी