‘उशेर'चा व्यवस्थापकीय संचालक विनोद चतुर्वेदी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:07 AM2021-09-21T04:07:52+5:302021-09-21T04:07:52+5:30
* बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उशेर ऍग्रो लिमिटेड कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक विनोद चतुर्वेदी याला ...
* बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उशेर ऍग्रो लिमिटेड कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक विनोद चतुर्वेदी याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली असून त्याला ५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. कोट्यवधीच्या बँक घोटाळ्याप्रकरणी मनी लँड्रिगच्या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी अन्य काही आरोपींना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
चतुर्वेदीला माय बँकेत १८ कोटींचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून अटक करण्यात आली होती. तामिळनाडू मर्कंटाइल बँकेत अन्य बनावट कागदपत्रे व कंपन्यांची स्थापना करून त्याने आणखी कर्ज उचलल्याचे तपासातून स्पष्ट झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला १८ सप्टेंबरला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली.