मुंबई : एकीकडे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विदर्भात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्यांनी मुलाचा विवाह सोहळा रद्द केला होता.
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मी जबाबदार’ या मोहिमेला प्रतिसाद देत, म्हाडाचे सभापती डॉ.विनोद घोसाळकर यांनी त्यांचा धाकटा मुलगा सौरभ घोसाळकर यांचा विवाह सोहळा रद्द केला.
सौरभचा विवाह येत्या रविवार दि. २८ रोजी सहारा स्टार या पंचतारांकित हॉटेलमध्ये होता. घोसाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना या सोहळ्यासाठी वेळ राखून ठेवण्याची विनंती आधी केली होती. मात्र, सध्या मुंबईत कोरोनाचे झपाट्याने वाढते रुग्ण आणि मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी ‘मी जबाबदार’ या आवाहनानुसार आम्ही लग्न सोहळा आणि स्वागत समारंभ रद्द केला, अशी माहिती मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांनी दिली.
डॉ.विनोद घोसाळकर यांनी वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सदर लग्न सोहळा आणि स्वागत समारंभ रद्द करत असल्याचे पत्र दिले. आपण एक चांगला निर्णय घेतला, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यानी यावेळी काढले.
--------------------------------