Join us

विनोद कांबळी बरे होऊन परतले घरी; रुग्णालयातून जाताना लोकांना काय दिला मेसेज?   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 23:15 IST

५२ वर्षीय कांबळीला सुरुवातीला २१ डिसेंबर रोजी लघवीच्या संसर्गामुळे आणि क्रॅम्प्ससाठी आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ठाणे : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला डॉक्टरांनी पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केल्यानंतर रुग्णालयातून आज सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

५२ वर्षीय कांबळीला सुरुवातीला २१ डिसेंबर रोजी लघवीच्या संसर्गामुळे आणि क्रॅम्प्ससाठी आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

रूग्णालयातून बाहेर पडताना कांबळी यांनी लोकांना दारू आणि अंमली पदार्थांचे सेवन कमी करण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, दुर्गुण एखाद्याचे जीवन नष्ट करू शकतात. 

आकृती हॉस्पिटलचे डॉ. शैलेश सिंह ठाकुर म्हणाले की, "कांबळी यांचे सगळे आरोग्य तपासणीचे अहवाल नॉर्मल आले आहेत त्यांना दहा ते पंधरा दिवसांनी फॉलोअपला यायला सांगितले आहेत तसेच पूर्णपणे बेडरेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे."

"आम्ही त्यांचे उपचार मोफत केले आहेत आणि इथूनही त्यांचे उपचार मोफत होतील", असे आश्वासन डॉ. शैलेश सिंग ठाकूर यांनी दिले.

टॅग्स :विनोद कांबळीठाणेआरोग्य