हाेळी साजरी करताना माहीम कोळीवाड्यात नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:05 AM2021-03-30T04:05:22+5:302021-03-30T04:05:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यभरात जमावबंदी लागू करण्यात आली असतानाही, रविवारी मुंबईतल्या माहीम कोळीवाडा परिसरात कोरोना नियमांचे उल्लंघन ...

Violation of rules in Mahim Koliwada while celebrating Haeli | हाेळी साजरी करताना माहीम कोळीवाड्यात नियमांचे उल्लंघन

हाेळी साजरी करताना माहीम कोळीवाड्यात नियमांचे उल्लंघन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यभरात जमावबंदी लागू करण्यात आली असतानाही, रविवारी मुंबईतल्या माहीम कोळीवाडा परिसरात कोरोना नियमांचे उल्लंघन करत होळी साजरी करण्यात आली. यात, १०० हून अधिक जणांनी होळीभोवती फेर धरला हाेता. याबाबत कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विलास शिंदे यांनी दिली.

कोरोना नियमांचे पालन करून होळी साजरी करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानुसार, मुंबईत होळी आणि धुळवडीनिमित्त पोलिसांकडून बंदोबस्तासह गस्त घालण्यात आली. दरम्यान, माहीम कोळीवाडा परिसरामध्ये होळी साजरी करण्यासाठी अनेक लोक एकत्र जमले होते. १०० हून अधिक जण होळीभोवती फिरताना दिसले. त्यात अनेक जण विनामास्क होते. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांना नियमांबाबत सांगून घरी पाठविल्याचे शिंदे यांनी सांगितले.

....

Web Title: Violation of rules in Mahim Koliwada while celebrating Haeli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.