वाहतूक नियमांचे उल्लंघन; एसटी चालकांच्या पगारातून दंडाची रक्कम करणार वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 06:03 AM2019-07-14T06:03:36+5:302019-07-14T06:03:48+5:30

चुकीच्या पद्धतीने आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविल्यास संबंधित एसटी चालकांच्या पगारातून दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल.

Violation of traffic rules; ST recovering the penalty amount from the driver's salary | वाहतूक नियमांचे उल्लंघन; एसटी चालकांच्या पगारातून दंडाची रक्कम करणार वसूल

वाहतूक नियमांचे उल्लंघन; एसटी चालकांच्या पगारातून दंडाची रक्कम करणार वसूल

Next

मुंबई : चुकीच्या पद्धतीने आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविल्यास संबंधित एसटी चालकांच्या पगारातून दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल. कारण वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून ई-चलानद्वारे दंड आकारणी करण्यात आली आहे. दंड न भरल्यास आरटीओमध्ये एसटीचे पासिंग होणार नाही. त्यामुळे आता या प्रकरणी विभाग नियंत्रणाकडून परळ आणि उरण आगार व्यवस्थापकाला संबंधित चालकांच्या पगारातून दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणी परळ आगारातील ११ आणि उरण आगारातील ५ तक्रारी दाखल आहेत. या तक्रारीतून संबंधित चालकांकडून दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलीस दंडाची रक्कम वसूल करतात. यासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गाडीचा क्रमांक, वेळ नमूद केली जाते. ठिकठिकाणी असलेले वाहतूक पोलीस अशा वाहनांचे फोटो काढून तक्रार दाखल करतात. ही तक्रार परिवहन मंडळाला देण्यात येते. त्याप्रमाणे विभाग नियंत्रणाकडून आगाराचे नाव, एसटी गाडीचा क्रमांक, दिनांक, वेळ, चलान क्रमांक आणि दंडाची रक्कम यांचे पत्रक आगार व्यवस्थापकाला देण्यात येते.
>कर्मचारी संघटनांचा विरोध
कोणताही चालक जाणूनबुजून वाहतुकीचे नियम मोडत नाही. त्यामुळे दंडाची रक्कम चालकांकडून वसूल करणे अयोग्य आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे. त्यातच आता दंडाची वसुली त्यांच्या पगारातून करणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे, असा नाराजीचा सूर आळवत कर्मचारी संघटनांनी याचा
निषेध केला आहे.

Web Title: Violation of traffic rules; ST recovering the penalty amount from the driver's salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.