व्हीआयपींना खुपतेय लालबागची झोपडी?
By admin | Published: August 23, 2014 01:13 AM2014-08-23T01:13:04+5:302014-08-23T01:13:04+5:30
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यास येणा:या व्हीआयपींचा त्रस सर्वसामान्य भक्तांप्रमाणो येथील झोपडीपट्टीवासीयांना होऊ लागला आहे.
Next
मुंबई : लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यास येणा:या व्हीआयपींचा त्रस सर्वसामान्य भक्तांप्रमाणो येथील झोपडीपट्टीवासीयांना होऊ लागला आहे. दर्शन घेण्यास जाताना व्हीआयपींच्या नजरेत येथील झोपडय़ा खुपत असल्याने पालिका निष्कासनाची कारवाई करत असल्याचा आरोप स्थानिक झोपडपट्टीवासीयांनी केला आहे.
पालिकेच्या निष्कासन विभागाने गुरुवारी लालबाग येथील दिनशा पेटीत लेनमधील 18 झोपडय़ांवर कारवाई केली. मात्र ही कारवाई गणोशोत्सवादरम्यान येणा:या व्हीआयपींमुळे होत असल्याचे स्थानिक श्रुतिका शिंदे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘घरकाम करून रहिवासी आपला उदरनिर्वाह चालवतात. मात्र गेल्या काही वर्षापासून केवळ गणोशोत्सव काळात पालिका प्रशासनातर्फे निष्कासनाचा प्रयत्न केला जात आहे. पालिका प्रशासन आणि मंडळाच्या पदाधिका:यांसोबत चर्चा केल्यानंतर दर्शनास येणा:या व्हीआयपींच्या नजरेत या झोपडय़ा खुपत असल्याने कारवाई होत असल्याचे कळाले.’ अन्यथा वर्षभर शांत बसणारे प्रशासन भर पावसाळ्यात आणि ऐन गणोशोत्सवाच्या काळातच कारवाई का करतात, असा सवालही शिंदे यांनी विचारला आहे.
येथील एकूण 22 झोपडय़ांपैकी 4 झोपडय़ा 1995 सालापूर्वीच्या असून उर्वरित 18 झोपडय़ा या 2क्क्क् सालापूर्वीच्या आहेत. सर्वच रहिवाशांकडे पुरावा म्हणून 2क्क्क् साली पालिकेने केलेल्या सव्रेक्षणाची पावती असल्याचा दावा ‘युवा’ या स्वयंसेवी संस्थेचे समन्वयक जगदीश पाटणकर यांनी केला आहे. पाटणकर म्हणाले, ‘शासनाने काढलेल्या राजपत्रत 2क्क्क् सालापूर्वीच्या झोपडय़ांना संरक्षण दिले आहे. तरीही पालिका कारवाई करत आहे. याबाबत गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांची भेट घेतल्यानंतर तत्काळ कारवाईस स्थगिती देण्यात आली आहे.’ यासंदर्भात मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांना विचारणा केली असता, अशी कोणतीही तक्रार मंडळाने केली नसल्याचे साळवी यांनी सांगितले. मंडळाला या झोपडय़ांचा कोणताही त्रस नसल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय पालिका केवळ मंडळाला त्रस होतोय म्हणून कारवाई करत असेल तर निष्कासन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
याबाबत पालिकेच्या साहाय्यक आयुक्त संजय कु:हाडे यांना विचारणा केली असता वॉर्डमध्ये सर्वच ठिकाणी कारवाई होत असल्याचे सांगण्यात आले. शिवाय याआधीही या झोपडय़ांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली. व्हीआयपींना कोणताही त्रस होतोय म्हणून कारवाई केली नसून झोपडय़ा अनधिकृत असल्याने कारवाई केल्याचे कु:हाडे यांनी सांगितले.