परदेशी चलनाच्या अवैध व्यवहार प्रकरणी विराज पाटीलला अटक; ईडीची मोठी कारवाई
By मनोज गडनीस | Published: December 28, 2023 05:19 PM2023-12-28T17:19:49+5:302023-12-28T17:20:33+5:30
अवैधरित्या व्यवहार केल्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी टीपी ग्लोबल एफएक्स कंपनीच्या विराज पाटील याला मुंबईत अटक केली आहे.
मनोज गडनीस,मुंबई: परदेशी चलनाच्या व्यवहारांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची अनुमती नसतानाही अवैधरित्या त्यांचे व्यवहार केल्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी टीपी ग्लोबल एफएक्स कंपनीच्या विराज पाटील याला मुंबईत अटक केली आहे. तो दुबईत वास्तव्यास होता व तेथून हे अवैध व्यवहार चालवत होता. तो मुंबईत दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली आहे.
या प्रकरणी त्याच्या व त्याच्या साथीदारांच्या विविध बँक खात्यातील १२१ कोटी १६ लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे तर, १२१ कोटी २३ लाख रुपयांची अचल मालमत्ता देखील जप्त केली आहे. यामध्ये रोख रक्कम, सोने, फ्लॅट, हॉटेल, रिसॉर्ट, वाहने अशा अचल मालमत्तेचा देखील समावेश आहे.