टाटा रुग्णालयाच्या नावे ‘व्हायरल’ मेसेज खोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:01 AM2018-07-15T06:01:40+5:302018-07-15T06:01:52+5:30

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कर्करोगाचे निदान झाल्याचे समजताच सोशल मीडियाप्रमाणे सामान्यांमध्ये चर्चा रंगली.

The 'viral' message in the name of Tata Hospital is false | टाटा रुग्णालयाच्या नावे ‘व्हायरल’ मेसेज खोटा

टाटा रुग्णालयाच्या नावे ‘व्हायरल’ मेसेज खोटा

Next

मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कर्करोगाचे निदान झाल्याचे समजताच सोशल मीडियाप्रमाणे सामान्यांमध्ये चर्चा रंगली. त्या पार्श्वभूमीवर सध्या टाटा रुग्णालयाच्या नावे कर्करोगाविषयी संदेश देणारा मेसेज सोशल मीडियावर चांगलाच ‘व्हायरल’ झाला आहे. मात्र या मेसेजची सत्यता पडताळली असता टाटा मेमोरिअल रुग्णालय प्रशासनाने हा मेसेज खोटा असल्याचे सांगत आम्ही असा कोणताही मेसेज पाठविला नसल्याचे सांगितले आहे.
सोशल मीडियावर बऱ्याचदा मेसेज, व्हिडिओ आणि फोटोंची सत्यता न पडताळता अनेकदा पोस्ट शेअर केल्या जातात. कधीकधी या पोस्ट अत्यंत गंभीर विषयांशी निगडित असतात, मात्र तरीही नेटीझन्स या विषयांकडे दुर्लक्ष करून अशा पोस्ट वेगाने व्हायरल करतात. असेच काहीसे कर्करोगाविषयीच्या त्या मेसेजचे झाले असून त्याचे वेगाने शेअरिंग होते आहे. या मेसेजमध्ये १०-१२ मुद्द्यांमध्ये कर्करोगाविषयी माहिती देत काही प्रतिबंधात्मक उपाय सुचविले आहेत. शिवाय, मेसेजच्या अखेरीस तो संदेश टाटा मेमोरिअल रुग्णालयाने पाठविला असल्याचे म्हटले आहे.
याविषयी, टाटा मेमोरिअल रुग्णालयाच्या गॅस्ट्रोइन्टेस्टाईन आणि एचपीबी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी सांगितले, असा कोणत्याही प्रकारचा संदेश रुग्णालय प्रशासनाकडून पाठविण्यात आला नाही. या संदेशातील कर्करोगाविषयीची माहितीही चुकीची आहे. सोशल मीडियाच्या दोन्ही बाजू ओळखून अशा पद्धतीच्या पोस्ट शेअर करणाºया प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेवून पोस्टची सत्यता पडताळून अशा पोस्ट शेअर केल्या पाहिजेत.
व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये १०-१२ मुद्द्यांमध्ये कर्करोगाविषयी माहिती देत काही प्रतिबंधात्मक उपाय सुचविले आहेत. शिवाय, मेसेजच्या अखेरीस तो संदेश टाटा मेमोरिअल रुग्णालयाने पाठविला असल्याचे म्हटले आहे.

Web Title: The 'viral' message in the name of Tata Hospital is false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.