Join us

Viral Video: आत्महत्या करण्यासाठी ट्रेनसमोर झोपला, ट्रेन जवळ आली तेवढ्यात; पाहा थरारक व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 6:36 PM

ही धक्कादायक घटना मुंबईतील शिवडी स्टेशनवर घडली असून, स्टेशनवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली.

मुंबई:रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेला एक धक्कादायक व्हिडिओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ट्रेनसमोर आत्महत्या करण्यासाठी झोपल्याचे दिसत आहे. पण, त्याच्या जवळ येताच ट्रेनचा चालक ब्रेक लावतो आणि त्या व्यक्तीचा जीव वाचतो.मिळालेल्या माहितीनुसार, ही मुंबईतील शिवडी स्टेशनची आहे. स्टेशनवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली. व्हिडिओच्या सुरुवातीला एक व्यक्ती रेल्वे रुळावर चालताना दिसत आहे. तेवढ्यात ट्रेन येते आणि आत्महत्या करण्याच्या उद्देशाने तो माणूस रुळावर झोपतो. 

ट्रेन त्या व्यक्तीच्या अगदी जवळ येते, पण तेवढ्यात लोको पायलट इमर्जन्सी ब्रेक लावतो. ट्रेन वेळीच थांबल्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचतो. यादरम्यान काही आरपीएफ जवान त्या माणसाकडे धावतात आणि त्या माणसाला रुळावरुन उठवतात. फुटेजमध्ये दिसत असलेल्या वेळेनुसार ही घटना सकाळी 11.45 च्या सुमारास घडली आहे.

रेल्वे मंत्रालयाने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला व्हिडिओ शेअर करत रेल्वे मंत्रालयाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मोटरमनने कौतुकास्पद काम केले. मुंबईतील शिवडी स्टेशनवर मोटरमनने एका व्यक्तीला रुळावर पडलेले पाहिले, त्याने तत्परतेने आपत्कालीन ब्रेक लावून त्या व्यक्तीचे प्राण वाचवले. हा व्हिडिओ एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि 6 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे, तर सुमारे 900 लोकांनी रिट्विट केले आहे.  

टॅग्स :रेल्वेसीसीटीव्ही